Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? शिवसेना नेत रामदास कदम आणि भाजप नेते रवींद्र चव्हाणांमध्ये जुंपली

Maharashtra Politics Ramdas kadam vs Ravindra Chavan: महायुतीच्या चिंतेत आता वाढ झालीय, लोकसभेतल्या पराभवानंतर एकजुटीने लढण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या महायुतीची चिंता आता कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वाढल्यात, काय घडतंय महायुतीत आणि कोण गणितं बिघडवतंय महायुतीची पाहुयात.
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? शिवसेना नेत रामदास कदम आणि भाजप नेते रवींद्र चव्हाणांमध्ये जुंपली
Ramdas kadam vs Ravindra Chavan
Published On

रामदास कदम शिवसेनेचे फायरब्रँड नेते. माजी पर्यावरण मंत्री आणि कट्टर शिवसैनिक.रामदास कदम महायुतीतल मित्रपक्षांवर थेट बोलतात आणि महायुतीत मिठाचा खडा पडतो. आधी अजित पवारांना टार्गेट केल्यानंतर आता त्यांनी आपली तोफ भाजपच्या रवींद्र् चव्हाणांकडे वळवलीय. कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात मुंबई-गोवा हायवेवरुन वाद सुरु असताना महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला.

शिवेसेनेतील फुटीनंतर कोकणातील राजकारणात राजकीय बदल झाले. भाजपनंही कोकणात हातपाय पसरले...त्यात भाजपचे मंत्री आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू रवींद्र चव्हाण अधिक आक्रमक आणि सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार योगेश कदम आमदार आहेत.

शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाला आणि शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत करून या मतदारसंघात कदम पिता-पुत्रांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे कदमांनी शिंदेंची वाट धरली. मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद तर आहेतच मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही इच्छुकांची यादी मोठी आहे. त्यामुळे योगेश कदमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे आपल्या मुलाची जागा वाचवण्यसाठी रामदास कदम आक्रमक झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच त्यांनी चव्हाणांना भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिलीये.

दरम्यान कदमांच्या तिखट टिकेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतलीय. याबाबत थेट मुख्यमंत्री शिंदेंशी बोलणार अशल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. रामदास कदम नेहमीच मित्रपक्षांविरोधात स्फोटक वक्तव्य करतात.आगामी विधानसभेआधी कदमांनी केलेल्या या वक्तव्यानं मात्र खळबळ उडवून दिलीये. त्यामुळे कदमांची ही तडफड पुत्रप्रेमातून होतेय की कोकणातील भाजपचा वाढता प्रभाव थोपवण्यासाठी कदमांच्या रुपानं शिंदेंची ही रणनिती म्हणायची हेच पाहावं लागेल. मात्र सध्यातरी कदमांच्या वक्तव्यानं महायुतीतील वातावरण गढूळ झालंय एवढं नक्की.

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? शिवसेना नेत रामदास कदम आणि भाजप नेते रवींद्र चव्हाणांमध्ये जुंपली
Maharashtra Politics : आधी रामदास कदम बरसले, मग रवींद्र चव्हाण संतापले; आता फडणवीस म्हणाले शिंदेंसोबत बोलतो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com