Yogesh Kadam Accident : मी सुखरूप आहे, काळजी करू नका - आमदार योगेश कदम

अपघातानंतर आमदार योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया
Yogesh Kadam Car Accident
Yogesh Kadam Car Accident SAAM TV

जितेश कोळी

Yogesh Kadam Car Accident News : शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात झाला. पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Yogesh Kadam Car Accident
Yogesh Kadam Car Accident : शिंदे गटाचे आमदार योगेश कदमांच्या कारला भीषण अपघात; घातपाताचा संशय

मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला होता. रात्री १०.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. परंतु आई जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी सुखरूप आहेत. आपण कोणीही आमची चिंता करू नका. आज एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो आहे. मला कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही. त्यासोबतच माझे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडणार आहे असं योगेश कदम म्हणाले आहे.

योगेश कदम यांच्या कारला अपघात कसा झाला?

आमदार योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत अपघात झाला. कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने असतानाही टँकरने धडक दिली.

शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Yogesh Kadam Car Accident
Ramdas Kadam : रामदास कदम यांचा अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला...'

अपघातानंतर योगेश कदम मुंबईला रवाना

अपघातानंतर आमदार योगेश कदम हे मुंबईला दुसऱ्या वाहनाने रवाना झाले. तर अपघातानंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. आमदारांच्या कारला धडकल्यानंतर टँकर उलटला असल्याची प्राथमिक माहिती आहे.शिंदे गटातील शिवसैनिकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

दरम्यान, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागला आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती आहे. या अपघातात आमदार कदम यांच्या कारचे आणि पोलीस वाहनाचेही नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com