Ramdas Kadam : रामदास कदम यांचा अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला...'

अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका केली
ramdas kadam
ramdas kadamSaam TV
Published On

जितेश कोळी

Ramdas Kadam News : महाविकास आघाडीतील माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. 'राष्ट्रवादीच्या पडलेल्या माजी आमदाराला निधी देऊन आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला होता, असा आरोप रामदास कदम यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर केला. (Latest Marathi News)

ramdas kadam
Ajit Pawar: कोणी बोलावत नसेल म्हणून आदेश काढला असेल, चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' आदेशावर अजित पवारांची टोलेबाजी

शिंदे गटाचे वरिष्ठ नेते, माजी आमदार रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जामगे येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी ही टीका केली आहे.

'महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझा मुलगा दापोलीत शिवसेनेचा विद्यमान आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पडलेल्या माजी आमदाराला निधी देऊन शिवसेना आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला होता, असा आरोप गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.

ramdas kadam
Maharashtra Politics :'समृद्धीच्या टक्केवारीतून पक्ष बनत नाही, तर...'; संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जावरून पटोले यांना कदम यांचे उत्तर

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला नाही असा सवाल उपस्थित करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना रामदास कदम यांनी जोरदार उत्तर दिले.

मराठी भाषेसाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा. सर्वांनी एकत्र येत विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर केला तर केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवता येईल. पटोले यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित का केला नाही, असा उलट सवाल करत महाविकास आघाडी सरकारच्या काळातच अजित पवार यांनी एसटी महामंडळाचे विलीनीकरण होऊ शकत नाही हे सांगितले होते. त्यामुळे नाना पटोले यांनी अजित पवार यांनाच हा प्रश्न विचारावा असे रामदास कदम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com