Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Pravin Darekar Rection On Raj Thackeray Speech : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलंय.
Pravin Darekar Rection On Raj Thackeray Speech
Pravin Darekar Rection On Raj Thackeray Speech
Published On

देवेंद्र फडणवीसांचे उपकार लक्षात ठेवा, आपण शब्दाची कोटी तर समजू शकतो. मात्र मराठी माणसाच्या हिताशी तडजोड करू नका. बोलायचं मराठी माणसाच्या हितासाठी आणि मदत करायची दुसऱ्यांना असं करू नका. मीही तिथूनच आलोय, मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही, असं म्हणत भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंवर शरसंधान केलंय.

राज- उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यात दोन्ही बंधूंनी भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपण दोघे एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत दोन्ही बंधू पुढील काळात युतीतून निवडणुकांना समोरे जाणार आहेत. यावेळी दोन्ही बंधूंच्या भाषणा तोच ठाकरेपणा दिसला आणि त्याच पद्धतीने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. त्यानंतर भाजपकडून उत्तर दिलं जातं आहे. भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हिंदी सक्तीचा निर्णयामुळे आम्ही एकत्र आलो. त्यामुळे आमच्या एकत्र येण्यात फडवणीस यांचा मोठा हातभार आहे. आम्हाला एकत्र आणण्यात बाळासाहेब ठाकरेंनाही अपयश आलं पण फडणवीसांमुळे आम्ही एकत्र आलो, अशी शब्दाची कोटी करत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

Pravin Darekar Rection On Raj Thackeray Speech
CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

त्यांच्या या टीकेला प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वाविषयी मळमळ आणि गरज ओकण्याच काम सुरू झालं. दोघांच्याही भाषणात देवेंद्र फडणवीसांचं महिमा मंडन सुरू होतं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. फळ देणाऱ्या झाडावरच लोक दगड मारतात, वांझोट्या झाडावर दगड मारत नाहीत. फडणवीस ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने महाराष्ट्राला पुढे नेत आहेत, मग आता आपलं कसं होणार? याची चिंता आजचा इव्हेंटमधून दिसते.

राज ठाकरे मराठीचं महत्व सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देऊन एकजुटीचा आवाहन करत होते. मात्र उद्धव ठाकरेंची आगतिकता दिसत होती,असं प्रविण दरेकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com