CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Chief Minister Devendra Fadnavis : काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडघे पाटील यांची याचिका मुंबई उच्च न्यायायलयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळलीय. प्रफुल्ल गुडधे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे.
PM Awas yojana
CM Devendra FadnavisSaam Tv
Published On

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा दिलाय. फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठानं तांत्रिक मुद्यांचे कारण देत फेटाळून लावण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी याचिका दाखल केली होती.

का फेटाळण्यात आली याचिका

प्रफुल्ल गुडघे यांची 'याचिका नियमांना धरून नाही' असा आधार घेत नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळून लावली आहे. मुळात निवडणूक संदर्भातली याचिका दाखल करताना याचिका दखल करणारा उमेदवार स्वतः जातीने उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र प्रफुल्ल गुडधे यांच्या याचिके संदर्भात तसे झालं नाही असं निरीक्षण नोंदवत नागपूर खंडपीठ ठाणे गुडघे यांची याचिका फेटाळून लावली आहे. आता काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे.

का केली होती याचिका?

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या वेळेला निवडणूकीच्या नियमांचा उल्लंघन झालं, म्हणून दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करावी, देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी प्रफुल्ल गुडधे यांनी त्यांच्या याचिकेतून केली होती. मात्र गुडघे यांची 'याचिका नियमांना धरून नसल्याचं म्हणत याचिका न्यायालयाने फेटाळून लावण्यात आलीय.

PM Awas yojana
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती,पण हिंदीचाही अभिमान: मुख्यमंत्री फडणवीस

दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधेसह नागपूरच्या इतर ७ मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांनी याचिका दाखल केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी गुडधे यांचा ३९,७१० मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघांत निवडणूक घेताना आयोगाने कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होती. याची कारणे स्पष्ट केली नव्हती.

PM Awas yojana
Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा निवडणूक आयोगाने दिले नव्हते, असा आरोप गुडधे यांनी केला होता. तसेच पराभूत उमेदवारांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले ते दिले नाही, फॉर्म नंबर १७ दिले गेले नाहीत. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी पैसे मोजले पण ते देखील केले गेले नाही, माहिती अधिकार कायद्यात ही माहिती देणं बंधनकारक आहे, पण तेही केलं नाही, असं गुडधे यांनी याचिकेत आरोप करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com