
इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून राज्यात वातावरण तापलंय. त्रिभाषा निर्णयाविरोधात विरोधाकांनी सरकारवर टीका केली होती. तर दुसरीकडे राज-उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढणार होते. मात्र त्याआधीच महाराष्ट्र सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. तर मराठी भाषेचा मुद्दा राज्यभरात लावून ठेवण्यासाठी मनसैनिकांना खुली सुट देण्यात आलीय. महाराष्ट्रात राहत असला तर मराठी बोलता आलं पाहिजे अशी राज ठाकरेंची भूमिका आहे. त्याचवरून मुंबईतील एका उद्योजकानं राज ठाकरेंना ट्विट करत डिवचलंय.
मी मराठी शिकणार नाही काय करायचं ते करा, असं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचलं. त्यावरून मनसैनिक सडेतोड उत्तर दिलं जात आहे. दुकानदार किंवा कंपनीमधील कोणी कर्मचारी मराठीत बोलला नाही तर मनसे कार्यकर्ते त्यांच्या कानाखाली जाळ काढतात. पण आता थेट राज ठाकरेंनाच एका उद्योजकानं डिवचल्यानं राज्यभरात खळबळ उडालीय.
राज ठाकरेंनाच धमकी दिल्यानं मनसैनिक काय रिअॅक्शन देतील याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. पण त्याचवेळी राज ठाकरेंना सोशल मीडियावर डिचवणारा केडिया नेमका कोण याबाबत विचारणा केली जात आहे. सुशील केडिया हे उद्योजक आहेत. केडिया नॉमिक नावाची त्यांची कंपनी आहे. शेअर मार्केट गुंतवणूकदार आणि शेअर मार्केट क्षेत्रातील नामांकीत व्यवसायिक म्हणून त्यांची मुंबईमध्ये ओळख आहे. केडिया गेल्या ३० वर्षांपासून ते मुंबईत राहत असून व्यवसाय करत आहेत.
दरम्यान केडियाच्या ट्विटनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिली जात आहे. भाषेवर कोणी काही बोलत असेल तर त्यांच्या कानाखाली बसणार. महाराष्ट्रात मराठीच बोलली जाणार. ज्याला कुणाला येत नसेल त्यांना आम्ही मराठी भाषेत शिकू. यापुढे मराठी शिकायचेच नाही काय करायचं असेल ते करून घ्या, म्हणणाऱ्याच्या कानाखाली जाळच काढल्या जाईल. सुशील केडिया कोण आहे? उद्याचा पाच तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर निश्चितपणे त्याला काय करायचं ते करू. त्यांनी त्यांची ॲक्शन केली आता आमची रिअॅक्शन करण्याची वेळ आली आहेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.