नंदुरबारमध्ये भाजपच्या बड्या नेत्याने पदाचा राजीनामा दिला
माजी खासदार हिना गावित शिवीगाळ प्रकरणामुळे चर्चेत
भाजप नेत्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपला मोठा धक्का बसला. नंदुरबारमध्ये बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला. भाजप नेते विजय चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना विजय चौधरी यांनी विरोधकांनी बनावट क्लिप व्हायरल करून षड्यंत्र रचल्याचा थेट आरोप केला.
माझ्यावरील आरोपांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा अशी मागणी विजय चौधरी यांनी केली आहे. माजी खासदारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. विजय चौधरी यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या १३ वर्षांपासून पक्षाची विविध पदे सांभाळणाऱ्या चौधरी यांनी आपल्याविरोधात बनावट क्लिप प्रसारीत करून पक्षाला बदनाम करण्याचे राजकीय षड्यंत्र रचले गेल्याचा दावा केला आहे.
आपल्यावर झालेले आरोप खोटे असून या संपूर्ण प्रकरणाची पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मी पदावर असताना चौकशी निष्पक्ष होणार नाही, म्हणूनच मी उत्तर महाराष्ट्र संयोजक पदावरून मुक्त होत आहे, असे त्यांनी सांगितले.
विजय चौधरी यांचे गेल्या काही दिवसांपासून ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. राज्यातील बड्या राजकीय नेत्यांसोबत त्यांच्या संभाषण व्हायरल होत असून भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांच्या बद्दल फोन कॉलवर अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.