

शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार का
सुप्रिया सुळे अमित शाह भेटीमागचं कारण काय
शरद पवार नरेंद्र मोदी भेटीनंतर NDA प्रवेशाची चर्चा
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये वेगानं बदल होतोय. अशातच शरद पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार का? अशा चर्चांना पुन्हा उधाण आलंय. आणि त्याला कारण ठरलयं. पवार आणि सुप्रिया सुळेंनी केवळ सहा दिवसांत घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाची दोन वेळा घेतलेली भेट. गेल्या काही दिवसात राज्यातील नेत्यांनी NDA प्रणित सरकारमधील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी कशा घेतल्यात,पाहूयात.
7 जुलै 2026
पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे खासदार विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक
22 जुलै 2026
जंतरमंतरवर आंदोलन सुरु असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी संसदेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली
भेटीत विद्यार्थी आंदोलनावर चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं
23 जुलै 2026
दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर
27 जुलै 2026
दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली
27 जुलै 2026
त्याच दिवशी सुप्रिया सुळेंनीही खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली.
या भेटीगाठीमुळे पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना आणखीनच उधाण आलयं. मात्र, भाजप नेतृत्त्वानं एनडीए प्रवेशासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अट शरद पवारांना घातल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादीतील नेते भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी भेटीगाठी करत असल्याचं सूत्रांचं म्हणणंय. मात्र आता स्वत: पवारांनीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतांना पूर्णविराम दिलाय.
दिल्लीतील राजकीय भेट-गाठी पाहता डिलिमिटेशन विधेयकासाठी सत्ताधारी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करत असल्याचं स्पष्ट दिसतयं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला पवारांनी स्पष्ट नकार दिल्यानं आता पवारांच्या राष्ट्रवादीबाबत भाजप काय भूमिका घेणार? पवार खरंच मविआ सोडून एनडीएत जाणार का? याबाबत उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.