Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaamtv

Maharashtra Politics: देणगीवरुन राजकारण! संजय राऊतांनी राम मंदिरासाठी १ कोटी दिल्याचा दावा खोटा; भाजपचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: नववर्षात अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाहणार आहे. या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच राजकीय वातावरणही तापू लागले आहे.
Published on

Maharashtra Political News:

नववर्षात अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाहणार आहे. या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच राजकीय वातावरणही तापू लागले आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले होते. आता संजय राऊत यांनी राम मंदिरासाठी १ कोटी रुपये देणगी दिल्याच्या दाव्यावरुन नवा नाद सुरू झाला आहे.

राऊतांचा दावा खोटा..

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राम मंदिरासाठी 1 कोटी दिल्याचे म्हटले. त्यांच्या या दाव्यावर आता भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. राम मंदिराला 1 कोटी दिल्याचा संजय राऊतांकडून बनाव केला जात असून दान दिल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे ते खोटं बोलत आहेत, असा आरोप भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

काय म्हणाले राम कुलकर्णी?

राजकारणात रोज खोट बोलून बनवाबनवी करणारे खा. संजय राऊतांनी राममंदिर बांधकामासाठी खरंच एक कोटी दिले का? शंका घेण्यायोग्य आहे. देवाला केलेले दान गुपित असते, पण हे वारंवार उच्चारण करतात. मात्र त्यांनी एक कोटी देणगी दिल्याचा पुरावा नाही. धनादेशाचा चेक, किंवा मंदिर ट्रस्टची पावती नाही, मगं नेमके खरे काय ? असा सवाल भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी उपस्थित केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut News
Dry Days of 2024 (Full List): नवीन वर्षात तब्बल 'इतके' दिवस दारूची दुकाने बंद राहणार, तळीरामांची तडफड होणार; पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुनही ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपकडून यावर टीका झाल्यानंतर  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रन देण्याची गरज नाही आम्ही आधीपासून अयोध्येत आहोत, आम्ही सर्व जण अयोध्येत जाऊ..." असा पलटवार राऊतांकडून केला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut News
Parbhani Zp News : १५४ शिक्षक व कर्मचाऱ्यांना पाठविले घरी; बनवेगिरी करत मिळविली होती नोकरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com