Lok Sabha Survey: राज्यात मोदींचीच हवा; कोणताही सर्व्हे असो, आम्ही लोकसभेच्या 40 जागा जिकणार: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Lok Sabha Survey: एक नवीन सर्वेक्षण समोर आलं आहे. ज्यात राज्यात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे.
Devendra Fadnavis On Lok Sabha Survey
Devendra Fadnavis On Lok Sabha SurveySaam TV

Devendra Fadnavis On Maharashtra Lok Sabha Survey:

अलीकडेच पाच राज्यांच्या निवडणूक पार पडल्या ज्यात भाजपला तीन राज्यात तर काँग्रेसला एक राज्यात यश मिळालं आहे. या निवडणुकीला लोकसभेची सेमीफायनल असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. अशातच पुन्हा देशात मोदी यांचं सरकार येणार असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. यातच एक नवीन सर्वेक्षण समोर आलं आहे. ज्यात राज्यात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरने हा सर्वेक्षण केला आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात राज्यात एनडीए आघाडीला 19-21 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेस आघाडीला 26-28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis On Lok Sabha Survey
MP Cabinet Expansion: मध्य प्रदेशच्या नव्या मंत्र्यांची यादी आली समोर; मोहन यादव सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोण-कोण?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ''मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो. पण लक्ष्यात ठेवा, कुठलाही सर्वे असुद्यात हवा फक्त मोदी यांचीच आहे. आम्ही राज्यात 40 लोकसभा जागा पार करणार म्हणजे करणारच.'' पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. यावर इतरही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

'40 जागांवर लोकसभा निवडणुका जिंकू'

याच मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत की, ''28 आकडा आतापर्यंत मला सांगितलं, पण आमचा 35 ते 40 चा आकडा आहे. आम्ही किमान 40 जागांवर लोकसभा निवडणुका जिंकू, असा आम्हाला आत्मविश्वास आहे. अनेक लोक येणाऱ्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.''  

Devendra Fadnavis On Lok Sabha Survey
LIC ची ही Scheme तुम्हाला बनू शकते लखपती, फक्त 200 रुपये वाचून मिळू शकतात 28 लाख; काय आहे योजना?

'...त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगाव लागेल'

यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) म्हणाले की, ''सर्व्हे काय आला आहे, तो मी पाहिलेला नाही. मध्य प्रदेशचे सर्व्हे हा आमच्याच बाजूला आलेला होता. थोडी बेईमानी झाली नाही, तर निकाल आमच्या बाजूने लागला असता. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, दुसऱ्यांचे घर जाळून स्वतःच घर तुम्ही सजवतात हे लोकांना आवडणार नाही. त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगाव लागेल.''  (Latest Marathi News)

'सी व्होटरच्या सर्व्हेचा विचार करणं योग्य नाही'

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यावर म्हणाले की, ''पाच राज्यांची निवडणूक बघता सी व्होटरच्या सर्व्हेचा विचार करणं योग्य नाही. अजून याला वेळ आहे. आमच्या तिन्ही पक्षाचे नेते बसून जागा वाटपावर निर्णय घेतील. जागा कोणी लढावी हा युतीचा प्रश्न आहे, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, कोणालाही कुठे जागा दिली गेली तर आम्ही तिन्ही पक्ष मिळून संघटनात्मक काम करणार.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com