Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा ठाकरेंना धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Solapur Politics: सोलापूरमध्ये भाजपने मोठी राजकीय खेळी केली. भाजपने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान सोलापूरमध्ये भाजपची ताकद वाढली.
Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा ठाकरेंना धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'
uddhav thackeray news Saam tv
Published On

Summary -

  • जिल्हा परिषद निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का

  • सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये ठाकरे गटाच्या बड्या नेत्याेचा भाजपमध्ये प्रवेश

  • आनंद बुक्कानुरे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये

  • आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद वाढली

जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापूरच्या अक्कलकोटमधील ठाकरेसेनेच्या तालुका प्रमुखांनी पक्षाची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतलं. या पक्ष प्रवेशामुळे सोलापूरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये भाजपने ठाकरेसेनेला जोरदार धक्का दिला. ठाकरेसेनेच्या तालुकाप्रमुखांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. अक्कलकोट तालुक्यात भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे धक्का तंत्र सुरूच आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे विरोधी पक्षांना धक्के पे धक्के सुरू आहे.

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा ठाकरेंना धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: ऐन ZP निवडणुकीत ठाकरे सेनेला मोठा धक्का; माजी आमदाराने पक्ष सोडला, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

ठाकरेसेनेचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. संपूर्ण तालुका भाजपमय करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कंबर कसली आहे. एकमेव विरोधात म्हणून शिल्लक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या तालुकाप्रमुखाचा देखील भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता असल्याची भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. आनंद बुक्कानुरे यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान भाजपची ताकद वाढली असून ठाकरेंची ताकद कमी झाली.

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा ठाकरेंना धक्का, बड्या नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Raigad Politics: शिंदे गटाला मोठा धक्का; शिवसेनेचे ७ नगरसेवक अपात्र, काय आहे कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com