

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, डोंबिवली
Pandharpur Solapur highway accident news : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने (Republic Day pilgrimage accident) घाला घातलाय. सोलापूरमधील मंगळवेढाजवळ भाविकांच्या क्रुझर गाडीला भीषण अपघात झाला. यात तीन महिला आणि एका १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. हे सर्व भाविक मुंबई उपनगरातील डोंबिवलीचे असल्याचे प्राथमिक माहिती मिळालीय. मंगळवेढ्याजवळ झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे.
सोमवारी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाविकांची गाडी मंगळवेढामार्गे पुढील प्रवासासाठी जात होती. सायंकाळच्यावेळी ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने कट मारल्याने भाविकांची गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय. ८ जण गंभीर जखमी झाले आहे. विठू माऊलीच्या चरणी डोके टेकवले अन् पुढील प्रवासासाठी निघालेल्या डोंबिवलीच्या भाविकांवर काळाने घाला घातला.
पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर शरद नगर येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात डोंबिवली–दिवा परिसरातील चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला. देवदर्शनासाठी निघालेला हा प्रवास अखेरचा ठरल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या अपघातात १४ वर्षीय आदित्य गुप्ता यांच्यासह योगिनी केकाने, सविता गुप्ता आणि सोनम आहिरे या तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी दोघे उमेश नगर, डोंबिवली पश्चिम येथील तर दोघे दिवा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाहन ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी त्यांच्या घरी भेट देत माहिती घेतली. दरम्यान, या दुर्घटनेमुळे डोंबिवली व दिवा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.