विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

pandharpur accident : विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाने घाला घातलाय. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला.
pandharpur
solapur news Saam tv
Published On
Summary

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

मंगळवेढाजवळ भीषण अपघात

अपघातात चार महिला आणि 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

राज्यात अपघाताचं सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सोलापुरातील पंढरपूरच्या मंगळवेढाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना काळाने भाविकांवर घाला घातला. या अपघातात मृत पावलेले भाविक मुंबईचे असल्याची माहिती समोर येत आहे. चार जणांच्या मृत्यूने हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देव दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात झाला. कारमधील चार महिला आणि एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अपघातातील सर्व भाविक मुंबईची असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

pandharpur
डुप्लिकेट दारू ब्रँडेड कंपनीच्या बाटल्यांमध्ये, लाखोंचा मुद्देमाल जप्त; एक्साईज विभागाची मोठी कारवाई

नेमकं काय घडलं?

रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी पोहोचले. या अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाविकांची कार मंगळवेढा मार्गे पुढील प्रवासासाठी जात होती. मंगळवेढाजवळ ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने कट मारल्याने भाविकांची गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.

भीषण अपघातात तीन महिलांसह एका चौदा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य पाच ते सहा भाविक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या जखमींना मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

pandharpur
Mandir Vastu Tips: तुमच्या घरातील देव्हारा कोणत्या दिशेला आहे? चुकीच्या दिशेला असल्यास वाढू शकतो वास्तूदोष

अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. काही स्थानिक नागरिक अपघातग्रस्तांना मदत करत होते. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी गर्दी पांगवली. त्यानंतर रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. पोलिसांनी वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मिळून मृतदेह जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातामधील जखमींनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com