डुप्लिकेट दारू ब्रँडेड कंपनीच्या बाटल्यांमध्ये, लाखोंचा मुद्देमाल जप्त; एक्साईज विभागाची मोठी कारवाई

kalyan news : डुप्लिकेट दारू ब्रँडेड कंपनीच्या बाटल्यांमधून विक्री करण्यात येत होती. या गुन्ह्याचा पर्दाफाश एक्साईज विभागाने उघड केला आहे.
Kalyan news
Kalyan newsSaam tv
Published On
Summary

कल्याण एक्साईज विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई

डुप्लिकेट दारू ब्रँडेड बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ,दोघांना अटक

मांडा टिटवाळा परिसरात सुरू होता कारखाना

कारखान्यावर छापा बनावट मध्ये साठासह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण जवळील टिटवाळा परिसरात विदेशी दारूच्या बाटल्यांमधून दारू काढून नवीन ब्रॅण्डेड बाटल्यात बनावट दारू भरणाऱ्या टोळीचा कल्याणच्या एक्साईट विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला. गेल्या काही दिवसांपासून टिटवाळा मांडा परिसरात एका घरामध्ये हा गोरख धंदा सुरू होता. कल्याणच्या एक्साईज विभागाला माहिती मिळताच एक्सप्रेस विभागाच्या भरारी पथकाने या ठिकाणी छापा टाकत बनावटमध्ये साठ्यासह एकूण बारा लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर या प्रकरणी जयश्री केले रोहन केणे या दोघांना बेडा ठोकण्यात आल्या. यामध्ये जयेश केने यांच्या घरात हा कारखाना सुरू होता.

कल्याण एक्साईज विभागाच्या भरारी पथकाला मांडा टिटवाळा परिसरात मुंबई बडोदा प्रस्तावित हायवेवर बनावट मद्याचा साठा घेऊन एक गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीनुसार भरारी पथकाचे दीपक परब यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचला . एक संशयित गाडी येताच या पथकाला संशय आला त्यांनी ही गाडी थांबून चौकशी केली असता गाडीमध्ये विदेशी मदय साठा आढळून आला.

Kalyan news
Ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

एक्साईज विभागाच्या भरारी पथकाने तत्काळ चालक रोहन केणे याला ताब्यात घेत चौकशी केली असता बनावट दारू टिटवाळा मांडा परिसरात बनवत असल्याचे सांगितले. त्यानुसार एकसाईजच्या पथकाने मांडा टिटवाळा परिसरातील जयेश केणे यांच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरात बनावट बुच, प्लास्टिक जार बनावट विदेशी मध्य विविध ब्रँडच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या असं साहित्य आढळून आलं.

Kalyan news
तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कुणाशी करू; निधनानंतर रीलस्टार प्रथमेशचा हॉस्पिटलमधील Video चर्चेत, चाहत्यांवर शोककळा

एक्साईजच्या पथकाने तत्काळ हे सगळं साहित्य जप्त केले. या दोघांनाही अटक केली असून हे दोघं कधीपासून हा धंदा करतात, ते कुणाला ही दारू विकतात याचा तपास एक्साईज विभागाचे पथक करत आहे. दरम्यान ही बनावट दारू शहरातील ढाब्यांवर जात असल्याचा दाट संशय एक्सेस विभागाला असून एक्साईज विभाग त्या दृष्टीने पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com