Maharashtra Politics: शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, मात्र मंत्रिपदाचे वाटप गुलदस्त्यात?

Devendra Fadnavis And Eknath Shinde: शपथविधी सोहळा येत्या ५ डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे म्हटले जात आहे.
Maharashtra Politics: शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, मात्र मंत्रिपदाचे वाटप गुलदस्त्यात?
Devendra Fadnavis -Eknath Shindesaam tv
Published On

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले तरी देखील अद्याप राज्यात नवं सरकार स्थापन झालं नाही. सरकार कधी स्थापन होणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सर्वांनाच प्रश्न पडले आहेत. अशात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपच्या वरिष्ठांकडून त्यांच्याच नावाला पसंती देण्यात आली आहे. नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली, ठिकाण देखील ठरलं आहे. मात्र मंत्रिपदांचे वाटप अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण अद्याप महायुतीमधील भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून वाद सुरू आहे.

शपथविधी सोहळा येत्या ५ डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे म्हटले जात आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील का असा प्रश्न अजूनही तसाच आहे.

भाजप आणि शिवसेनेमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून मतभेद आहेत. त्यामुळे अजून मंत्रिपदाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. हा निर्णय होत नसल्यामुळे नवे सरकार स्थापन होण्यास वेळ लागत आहे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना गृहखातं पाहिजे. यामध्ये दोघांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे हे गृहखात आपल्याकडे मिळावं यासाठी नाराज झाले आहेत.

Maharashtra Politics: शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, मात्र मंत्रिपदाचे वाटप गुलदस्त्यात?
Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, भाजप कार्यर्त्यांकडून तक्रार, मुलगा अन् मुलीविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी गृहखातं कणखर नेत्याला मिळावे असे सांगितले. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना गृहखातं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. आता जर मुख्यमंत्रिपद भाजपकडे जात असेल तर उपमुख्यमंत्रिपद असलेल्या आमच्या पक्षाला गृहखातं मिळावं असे मत त्यांनी व्यक्त केले.

Maharashtra Politics: शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, मात्र मंत्रिपदाचे वाटप गुलदस्त्यात?
Maharashtra Politics: त्यांना डॉक्टरची गरज की मांत्रिकाची?, शिंदेंच्या आजारपणावर राऊतांचा खोचक टोला

तर भाजप देखील गृहखात्यावर अडून बसले आहेत. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील तर त्यांच्याकडेच गृहखातं असायला हवं असे भाजपचे मत आहे. दोन्ही पक्षांमध्ये गृहखात्यावरून सुरू असलेल्या वादामुळेच मंत्रिपदाच्या वाटपाचा निर्णय पुढे जात शपथविधी सोहळ्याला आणि सरकार स्थापन व्हायला विलंब लागत आहे.

Maharashtra Politics: शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, मात्र मंत्रिपदाचे वाटप गुलदस्त्यात?
Maharashtra Politics: शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, मात्र मंत्रिपदाचे वाटप गुलदस्त्यात?

तर दुसरीकडे, नाराज झालेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या तरे गावामध्ये गेले आहेत. त्याठिकाणी गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना ताप आणि सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले. साताऱ्यामध्ये गेलेले एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत गृहखात्याचा तिढा सुटत नाही तोपर्यंत शपथविधी सोहळ्याला विलंब लागणार असल्याचे चित्र यावरून दिसत आहे.

Maharashtra Politics: शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, मात्र मंत्रिपदाचे वाटप गुलदस्त्यात?
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com