Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

Bhandara Politics: भंडाऱ्यामध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. मोहाडी पंचायत समितीवरील राष्ट्रवादीची सत्ता गेली. सभापती आणि उपसभापतीला पदावरून पायउतार व्हावे लागले.
Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं
Sunetra Pawar saam tv
Published On
  • मोहाडी पंचायत समितीत राष्ट्रवादीला मोठा धक्का

  • सभापती आणि उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव

  • अविश्वास ठराव 10-2 मतांनी मंजूर झाला

  • दोन्ही नेत्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले

शुभम देशमुख, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मोहाडी पंचायत समितीमध्ये सत्ताधारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मोहाडी पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती या दोघांवरही दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल १० विरुद्ध २ अशा स्पष्ट बहुमताने पारित झाला आहे. या धक्कादायक निकालामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

पायउतार व्हावे लागलेले सभापती जगदीश शेंडे आणि उपसभापती रेवानंद ऊर्फ देवा चकोले हे दोघेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे पदाधिकारी मानले जातात. विशेष म्हणजे, तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांचे हे अत्यंत निकटवर्तीय आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या कट्टर समर्थकांना अशा प्रकारे पद गमवावे लागल्याने हा थेट आमदार कारेमोरे यांच्यासाठी आणि पर्यायाने अजित पवार गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं
NCP Split: अजितदादांची राष्ट्रवादी फुटणार? 'राष्ट्रवादीचे आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात'

मोहाडी पंचायत समितीच्या एकूण १२ सदस्यांपैकी तब्बल १० सदस्यांनी सभापती आणि उपसभापतींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही पदाधिकारी इतर सदस्यांना विश्वासात न घेता केवळ आपल्या मनमर्जीने विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केला होता. याच नाराजीतून १० सदस्यांनी एकत्र येत या दोघांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अखेर झालेल्या मतदानात १० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर सभापती आणि उपसभापतींच्या बाजूने केवळ २ मते पडली.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांची मोठी प्रतिक्रिया; भाजपवर डागली तोफ

मोहाडी पंचायत समितीमधील या मोठ्या उलथापालथीमुळे भंडारा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला आता एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या हाताधून ही सत्ता निसटल्याने आता मोहाडी पंचायत समितीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या परिस्थितीत विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना धूळ चारल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आपला गड राखण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं
NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com