Maharashtra Politics : नकली नोटा, पथनाट्य, पत्ते खेळ आणि होम-हवन ; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात राज्यभर जनआक्रोश आंदोलन

UBT Jan Akrosh Morcha : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी राज्यभर शिवसेनेचे जनआक्रोश आंदोलन पेटले आहे. पुणे, रत्नागिरी, बीड, अमरावती, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये अनोख्या आंदोलनातून सरकारविरोधी संताप व्यक्त.
UBT Jan Akrosh Morcha
UBT Jan Akrosh MorchaSaam Tv
Published On
Summary
  • उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारविरोधात राज्यभर जनआक्रोश आंदोलन

  • होम-हवन, नकली नोटा, पथनाट्य आणि पत्ते खेळ यांचा अनोखा वापर

  • काही ठिकाणी महाविकास आघाडीविरोधी घोषणांची चूक, लगेच सुधारणा

  • भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी ठाकरेंच्या सेनेचा ठाम निर्धार

राजधानी दिल्लीमध्ये ३०० खासदारांचा आयोगाच्या विरोधात एल्गार सुरू असतानाच राज्यात ठाकरेंची शिवसेनेही फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक झाली आहे. महायुती सरकारमधील बेताल, वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करत उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईपासून ते नाशिक, पुणे, नागपूर अन् छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात जनआक्रोश आंदोलन केले जात आहे. मुंबईतील आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याने राजधानीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. शिस्वैनिकांनी भरत गोगावले यांच्यासह राज्यातील महायुती सरकारच्या नेत्यांचे फोटो होम-हवनात टाकले. या वेळी कार्यकर्त्यांकडून पत्ते खेळण्याचा देखील कार्यक्रम रस्त्यावरच रंगवण्यात आला, तर नोटांनी भरलेली बॅग घेऊन भ्रष्टाचारावर निशाणा साधण्यात आला. फ्लेक्स घेऊन घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी वातावरण पेटवले.

UBT Jan Akrosh Morcha
Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

रत्नागिरीतही ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा मोर्चा काढला. ‘भ्रष्ट मंत्री, हतबल मुख्यमंत्री’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मात्र, आंदोलनाच्या दरम्यान काही पदाधिकाऱ्यांकडून चुकून महाविकास आघाडीविरोधी घोषणाही देण्यात आल्या. ‘महाविकास आघाडीचे करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशी घोषणाबाजी सुरू होताच नेत्यांनी ही चूक लक्षात घेत घोषणांमध्ये बदल केले.

UBT Jan Akrosh Morcha
Manisha Kayande News:Manisha Kayande यांचा Udhhav thackeray यांच्यावर निशाणा...

बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास दीड तास चाललेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मनसेनेते संजय शिरसाठ, मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहात रमी खेळल्याचा आरोप असलेल्या कोकाटेंचाही राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली.

UBT Jan Akrosh Morcha
Uddhav Thackeray: 'निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे सक्षम, तिसऱ्याची गरज नाही'; शिवसेना-मनसे युतीवर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात शिवसेना उबाठा गटाने मंत्र्यांच्या कारनाम्यांचे पथनाट्य सादर केले. प्रतीकात्मक नोटा उडवत डान्स बार प्रकरणावरून सरकारवर प्रखर हल्ला चढवण्यात आला. नाशिकमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेने शालिमार परिसरात निदर्शने केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सरकारविरोधी घोषणांनी वातावरण तापवले. तसेच रस्त्यावर पत्ते खेळून आंदोलकांनी निषेध केला.

UBT Jan Akrosh Morcha
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची दिल्लीत मोदींवर टीका; महाराष्ट्रात रण पेटलं, भाजप नेता संतापला

राज्यभर पेटलेल्या या आंदोलनातून ठाकरेंच्या शिवसेनेने महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हे आंदोलन केवळ विरोधापुरते न राहता, सरकारविरोधातील असंतोषाचा मोठा संदेश देणारे ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com