Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Raj Thackeray & Uddhav Thackeray Meeting : मनसेप्रमुख राज ठाकरे अनेक वर्षांनी मातोश्रीवर आले. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट झाली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये दोन्ही भावांनी २० मिनिटे चर्चा केली.
Raj Thackeray and Uddhav Thackeray meet in front of Balasaheb’s photo at Matoshree
Raj Thackeray and Uddhav Thackeray meet in front of Balasaheb’s photo at Matoshree
Published On
Summary
  • , राज ठाकरे अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  • दोन्ही भावांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत २० मिनिटे खासगी चर्चा केली.

  • भेटीचा मुद्दा स्पष्ट नाही, पण राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

  • या भेटीनंतर ठाकरे कुटुंबात एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आले. आगामी राजकारणाच्यादृष्टीने दोन्ही भावांची मातोश्रीवर भेट होणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. मातोश्रीवर दोन्ही भावांची भेट होणं, यातून त्यांनी विरोधकांना सूचक संदेश दिलाय.

गेल्या काही दिवसांपासून राज-उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मराठी वियज मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले होते. त्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजच्या भेटीमुळे हा भ्रम मिटला असल्याची प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिलीय.

सकाळी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचे स्वागत केलं. त्यावेळी संजय राऊत, बाळा नांदगांवकर, आदी मान्यवर नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पुष्प गुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन्ही नेते बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले. दरम्यान राज ठाकरे मातोश्रीवर आले हे पाहून मला खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

त्या खोलीत त्यांनी २० मिनिटे चर्चा केली. दोन्ही भावांचा बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो समोर उभे असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोन्ही भावांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली असून या चर्चेदरम्यान दोन्ही भावांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी व्यंगचित्रावर आपली मते मांडली. त्यानंतर आगामी काळात राजकीय दिशा कशी असेल याचीही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Raj Thackeray and Uddhav Thackeray meet in front of Balasaheb’s photo at Matoshree
राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

युती झाली - भास्कर जाधव

दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही पक्षांची युती झाल्याचं सांगितलं. 'आजचा दिवस हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा दिवस एक आशादायी' , असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. आगामी काळात राजकीय रणनीती कशी असेल,असा प्रश्न पत्रकारांनी भास्कर जाधव यांना केला. त्यावर भास्कर जाधव यांनी युती झालीय. त्यावर चर्चा झालीय असं उत्तर दिलं. दरम्यान आज संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट होणार आहे. वरळीत एका कार्यक्रमात दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.

Raj Thackeray and Uddhav Thackeray meet in front of Balasaheb’s photo at Matoshree
Pune Crime Rave Party: राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी कारवाई केली का? रोहित पवारांना वेगळाच संशय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com