
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात खडसे कुटुंबाचा उल्लेख होत असल्याने वाद निर्माण झाला आहे.
खडसे कुटुंबावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे.
पोलीस आणि वैद्यकीय तपासामुळे खरे सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
हे राजकीय षड्यंत्र असल्यास गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या पार्टीत राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पतीदेखील होते. प्राजंल खेवलकर यांच्यासह ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारवाईवरून आमदार रोहित पवार यांनी वेगळाच संसय व्यक्त करत सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलंय. (Pune Rave Party Controversy: Is Khadse Family Being Politically Targeted In Honeytrap Scandal?)
विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी हनी ट्रॅप प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत सरकराला घेरलं होतं. हनी ट्रॅपमध्ये शासकीय अधिकाऱ्यासह काही मंत्री सुद्धा अडकले असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर हे एका रेव्ह पार्टीत सापडले असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
मात्र पोलिसांच्या या कारवाईवरून आमदार रोहित पवार यांनी वेगळा संशय व्यक्त केलाय. रोहित पवार यांनी ट्विट करत पोलिसांच्या कारवाई राजकीय हेतूने करण्यात आलीय का सवाल केलाय. राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी ही कारवाई करण्यात आलीय का? कारण एकनाथ खडसे यांनी हनी ट्रॅप प्रकरणात अडचणीत आणलं होतं. असं पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय. पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईल.
पण खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी कारवाई करण्यात आलीय हेही पाहिलं पाहिजे. कोणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पण हे राजकीय षडयंत्र असेल तर हे चुकीचं असल्याचं रोहित पवार यांनी संशय व्यक्त करताना म्हटलंय.
पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु #हनी_ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या मा. खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे.
दरम्यान पु्ण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांकडून वेगाने कारवाई सुरू आहे. छाप्यावेळी पोलिसांना रेव्ह पार्टी सुरू असलेल्या फ्लॅटमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला आढळल्या होत्या. या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आज सुट्टीच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
डॉ. प्रांजल खेवलकर आणि त्यांचे मित्र आधी पुण्यातील पबमध्ये गेले होते. पण पब बंद असल्याने त्यांनी बीएनबी या अॅपवरुन खराडीतील दोन फ्लॅट हाऊस पार्टीसाठी बुक केले होते. खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसमध्ये हे फ्लॅट बुक करण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या नावानेच हे बुकिंग करण्यात आले होते.
हॉटेल बुकिंगच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत.रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ खेवलकर यांच्या नावाने फ्लॅट बुक करण्यात आले होते. एका फ्लॅटचे भाडे १० हजार ३५७ रुपये इतके होते. यापैकी एका रुमचे बुकिंग २५ ते २८ तारखेपर्यंत होते तर दुसऱ्या रुमचे बुकिंग २६ जुलै ते २७ जुलै या तारखेसाठी करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.