Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

MP Nagesh Patil Ashtikar Faces Setback: हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मोठा धक्का बसला. विधान परिषद निवडणुकीत त्यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर यांचा पराभव झाला.
Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव
Nagesh Patil AshtikarSaam Tv
Published On
  • नागेश पाटील आष्टीकरांना मोठा धक्का

  • नांदेड विधान परिषद निवडणुकीत मुलगा कृष्णाचा दारुण पराभव

  • ऑपरेशन टायगरचा निवडणुकीवर परिणाम

  • कृष्णा आष्टीकरांना मिळाली फक्त ८४ मतं

उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेसेनेत जाणाऱ्या हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मोठा धक्का बसला. विधान परिषद निवडणुकीत आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर यांचा पराभव झाला. कृष्णा पाटील आष्टीकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते. आता त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत त्यांना फक्त ८४ मतं मिळाली आहेत.

नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय झाला. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. अमरनाथ राजूरकर यांना ३३९ मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना फक्त ८४ मतांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना ५ मतं पडली. अमरनाथ राजूरकर यांनी कृष्णा पाटील आष्टीकर यांचा २५५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीमध्ये २३ मतं बाद ठरली तर एकूण ४५१ मतं मिळाली.

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव
Operation Tiger: ठाकरे गट की शिंदे गट? बंडखोरीच्या चर्चेदरम्यान ओमराजेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

नांदेड विधान परिषद निवडणुकीदरम्यान ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू होती. ठाकरेंचे विश्वासू खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे या निवडणुकीच्या दरम्यान सर्वांची धाकधूक वाढली होती कारण नागेश आष्टीकरांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे मतदार संभ्रमात होते. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांसोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील संभ्रमात होते. या संभ्रमाचा फटका आता कृष्णा पाटील आष्टीकरांना बसल्याचे बोलले जात आहे.

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव
'ऑपरेशन टायगर'चा पेपर मातोश्रीवर कसा फुटला? इनसाईड स्टोरी समोर; खासदाराच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा

कृष्णा आष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी शिवसेना ठाकरे गटाकडे फक्त १९ संख्याबळ होते. तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत होती. ऑपरेशन टायगर आणि आष्टीकरांचा शिंदेसेनेत जाण्याच्या चर्चा या सर्व घडामोडींचा फायदा भाजपचे उमेदवार अमर राजूरकर यांना झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आज दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे ६ बंडखोर खासदार शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. शिंदेंच्या या ऑपरेशन टायगरमुळे मात्र उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव
Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com