राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू आहे. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल.', असं सूचक विधान केलंय. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ऑपरेशन यशस्वी झाल्याचं म्हणत मोहिमेवर शिक्कामोर्तब केला.
एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ठाकरेंचे विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदेगटात जाणार असल्याची घोषणा केली. ओमराजे निंबाळकर यांनी आज त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण शिंदेंसोबत जाणार असल्याचे जाहीर केले. ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा असे आदेश दिले असून कार्यकर्ते यांना पाठीशी उभे राहत साथ द्या अशी देखील विनंती केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.