Ajit Pawar Political Journey: खासदार ते पाचव्यांदा उपमुख्यमंत्री, अजित पवारांचा झंझावाती राजकीय प्रवास

Ajit Pawar Latest News: अजित पवारांनी ५ वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsaam tv
Published On

Deputy CM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे राजकीय बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आज राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनी ५ वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री ही पदे सोपवण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar
Deputy CM Ajit Pawar: मी अजित अनंतराव पवार... 4 वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ‘देवळाली-प्रवरा’ या ठिकाणी झाला. अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत. अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला. अजित पवारांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांची पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले.

Ajit Pawar
Maharashtra Politics: 'पक्ष आमच्या सोबतच', अजित पवार यांचा दावा

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाच्या नेत्यांमध्ये नाव घेतले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना 'दादा' म्हणून ओळखले जाते. अजित पवार यांचा राजकीय कार्यकाळ हा खूपच चर्चेत राहिला आहे. खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असा अजित पवारांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासावर आपण नजर टाकणार आहोत...

Ajit Pawar
Raj Thackeray News: आज महाराष्ट्राचा ‘दिगू टिपणीस’ झाला; राज ठाकरेंची राज्यातील राजकीय घडामोडीवर मोठी प्रतिक्रिया

अजित पवार यांचा राजकीय प्रवास -

- १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ या कालावधीत ते लोकसभेत खासदार होते.

- १९९१ ते १९९५ - या कालावधीत ते विधानसभा सदस्य होते.

- नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ - या काळात ते जलसंधारण, ऊर्जा व नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते.

- २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९२ - या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते.

Ajit Pawar
Ajit Pawar News : आणखी छोटे-मोठे भूकंप होतील; भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानानंतर राजकीय हादरे

- १९९५ ते १९९९ - या काळात ते विधानसभा सदस्य राहिले.

- १९९९ ते २००४ - या काळातही ते विधानसभा सदस्य राहिले

- २७ ऑक्टोबर १९९९ ते २५ डिसेंबर २००३ - या काळात ते पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते.

- २००४ ते २००९ - या काळात ते विधानसभा सदस्य होते.

- २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर २००४ - या काळात ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे) या खात्याचे राज्यमंत्री होते.

Ajit Pawar
Maharashtra Politics: राज्याचं विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार? या तीन नावांची जोरदार चर्चा

- नोव्हेंबर २००९ - ते विधानसभा सदस्य होते

- ९ नोव्हेंबर २००४ ते ७ नोव्हेंबर २००९ - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे राज्यमंत्री होते.

- ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१० - या काळात ते जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे वगळून), ऊर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते.

- ११ नोव्हेंबर २०१० ते २९ सप्टेंबर २०१२ पर्यंत - या कालावधीत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन, ऊर्जा या खात्याचे मंत्री होते.

Ajit Pawar
Eknath Shinde News: तेव्हा अशा घटना घडतात.. CM शिंदेंनी सांगितले अजित पवारांच्या बंडाचे मोठे कारण, म्हणाले; दुय्यम स्थान...

- ७ डिसेंबर २०१२ पासून सप्टेंबर २०१४ पर्यंत ते - या कालावधीत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन, ऊर्जा या खात्याचे मंत्री होते.

- २०१४ ते २०१९ या फडणवीस सरकारच्या काळामध्ये ते राज्याचे विरोधीपक्ष नेते होते.

- महाविकास सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात ही ते उपमुख्यमंत्री होते.

- शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते.

- आता अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सराकरला पाठिंबा देत ते पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com