नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर
Ajit Pawar Oath Ceremony : राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंनी घडवून आणलेल्या भूकंपानंतर पुन्हा सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर आठ राष्ट्रवादी आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या राजकीय भूकंपानंतर भाजपच्या बड्या नेत्यानं मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात मोठे राजकीय हादरे जाणवायला सुरुवात झाली आहे.
राज्यातील राजकारणात झालेल्या भूकंपावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'अजित पवार यांचे स्वागत आहे. देशाचे नेतृत्व फक्त मोदी करू शकतात हे त्यांना मान्य आहे. अजून छोटे-मोठे भूकंप होत राहतील. कोण-कोण एकटं पडेल ते पाहत राहा.'
अजून बरेच लोक येणार आहेत. उद्धव ठाकरेच काय, अजून कोण-कोण एकटं पडतं ते पाहाच. अजून छोटे-मोठे राजकीय भूकंप होणार आहेत, असं सूचक विधानही गिरीश महाजन यांनी केलं. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही येणाऱ्या काही दिवसांत लवकरच होईल. आज फक्त राष्ट्रवादीचे मंत्री शपथ घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.