Deputy CM Ajit Pawar
Deputy CM Ajit PawarSaam Tv

Deputy CM Ajit Pawar: मी अजित अनंतराव पवार... 4 वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Ajit Pawar Oath Ceremony: अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
Published on

Ajit Pawar Latest News: राज्यातील राजकीय (Maharashtra Politics) नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Deputy CM Ajit Pawar
Supriya Sule : अजित पवार आणि राष्ट्रवादीतील घडामोडींवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया...

अजित पवारांनी आज मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते थेट सर्व आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सराकरमध्ये सहभागी झाला.

Deputy CM Ajit Pawar
Sanjay Raut Tweet: 'उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू' शरद पवारांचा संजय राऊतांना शब्द

नुकताच अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अनेक आमादारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनी ५ वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर आतापर्यंत अजित पवार हे पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

अजित पवार हे राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री झाले असून एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी असणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Deputy CM Ajit Pawar
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? साम टीव्हीला सूत्रांची माहिती

अजित पवारांच्या या निर्णयामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते असे म्हटले जात होते. अखेर अजित पवार यांनी बंड पुकारत थेट शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांना ३५ आमदारांचा पाठिंबा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आणि अमोल कोल्हे हे सर्वजण अजित पवार यांच्यासोबत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com