Sanjay Raut Tweet: 'उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू' शरद पवारांचा संजय राऊतांना शब्द

Ajit Pawar Support Shinde Fadnavis Government: अजित पवार यांना राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यातील काही आमदार आज त्यांच्यासोबत शपथ घेण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut Tweet
Sanjay Raut TweetSanjay Raut Tweet
Published On

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणार आहेत.

काही आमदारांना सोबत घेऊन अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यातील काही आमदार आज त्यांच्यासोबत शपथ घेण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut Tweet
NCP MLAs at Raj Bhavan: राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट? अजित पवार राजभवनात, शरद पवारांच्या पुणे कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण

दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माझं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा उभे राहू असा शब्द दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, 'महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री. शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले" मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.'

Sanjay Raut Tweet
Ajit Pawar Live News: दादा आणि माझ्यात कधीच वाद होणार नाही - सुप्रिया सुळे

दरम्यान शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रीय सुळे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रवादीत फूट पडली असल्याचे सुप्रीय सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com