Political News : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार 35 आमदारांसोबत राजभवनावर दाखल झाले आहे. अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीतील 40 आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीतील या घडामोडींवर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुळे यांनी म्हटलं की, हा संपूर्ण निर्णय अजित पवार यांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. सुप्रिया सुळेंची साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या होत असलेला शपथविधी शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत असल्याची चर्चा होती, पण त्यावरही पडदा पडला आहे. (Latest Marathi News)
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे ९ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार यांच्यासहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार सरकारला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. (Political News)
अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीतील काही आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे यांच्यासह जवळपास 18 आमदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गैरहजर होते अशी माहिती आहे.
या बैठकीतून सुप्रिया सुळे निघून गेल्या होत्या. त्यानंतर अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन थेट राजभवनात दाखल झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.