Maharashtra Politics: 'पक्ष आमच्या सोबतच', अजित पवार यांचा दावा

Ajit Pawar Claim on Party Name and Symbol: पक्ष आमच्या सोबतच', अजित पवार यांचा दावा
Ajit Pawar Press Conference
Ajit Pawar Press ConferenceSaam Tv
Published On

Ajit Pawar Claim on Party Name and Symbol: 'पक्ष हा आमच्या सोबतच आहे', असं नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर आम्ही भाजपसोबतही जाऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत. पक्ष आणि चिन्ह दोन्ही माझयाकडे आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले की, ''आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिवसेना आणि भाजपच्या सरकारमध्ये जायचा निर्णय घेतला. त्या प्रकारे मी आणि सहकाऱ्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे. इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न राहील. राज्यमंत्रीपद, मंत्रिपदे दिली जातील.'' (Breaking News)

Ajit Pawar Press Conference
Eknath Shinde News: तेव्हा अशा घटना घडतात.. CM शिंदेंनी सांगितले अजित पवारांच्या बंडाचे मोठे कारण, म्हणाले; दुय्यम स्थान...

ते म्हणाले, ''या संदर्भात अनेक दिवस चर्चा चालसू होती. राजकीय परिस्थिती आहे. राज्याची परिस्थिती आहे या सगळ्याचा विचार करता विकासाला महत्व दिलं पाहिजे, असं सर्व सहकाऱ्यांचं मत झालं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गेली ९ वर्षे जो कारभार सुरू आहे. ते देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. असं प्रयत्न सुरू असताना त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं मत झालं.''

अजित पवार म्हणकले की, ''सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रस्न आहेत. ज्या वेळेस विरोधी पक्षांची बैठक होती. त्यातून आउटपूट काही निघालं नाही. त्यामुळे देशाला भक्कम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुले आम्ही तसा निर्णय घेतला.''  (Latest Marathi News)

अजित पवार पुढे म्हणाले की, ''विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. मी विरोधी पक्षाचा राजीनामा दिला. सर्वांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात काम केलं. त्यामुळे हा पक्ष इथपर्यंत पोहोचला आहे. तरुणांना संधी, नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत. अडीच वर्षे काम करत असताना, विकास हा एकमेव विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. काही टीका टिप्पणी करणार. त्याला उत्तर देणार नाही.''

Ajit Pawar Press Conference
Raj Thackeray News: आज महाराष्ट्राचा ‘दिगू टिपणीस’ झाला; राज ठाकरेंची राज्यातील राजकीय घडामोडीवर मोठी प्रतिक्रिया

'सर्व निवडणुका पक्षाच्या नावाखाली चिन्हाखाली लढवणार'

ते म्हणाले की, ''हा निर्णय घेत असताना बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य होता. पक्ष सगळा याबरोबरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील झालो. यानंतरच्या सर्व निवडणुका पक्षाच्या नावाखाली चिन्हाखाली लढवणार. त्यातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत.''

छगन भुजबळ काय म्हणाले?

यावेळी बोलताना नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ''आम्ही सहमत आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सरकारमधील तिसरा घटक म्हणून सामील झालो आहोत. पक्ष सोडला नाही. ज्या चर्चा सुरू होती. त्या बद्दल बोलत नाही. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर कुठे तरी सकारात्मक काम करणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास आहे. अतिशय मजबुतीने देशाचे नेतृत्व त्यांच्या हाती सुखरूप आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com