Eknath Shinde News: तेव्हा अशा घटना घडतात.. CM शिंदेंनी सांगितले अजित पवारांच्या बंडाचे मोठे कारण, म्हणाले; दुय्यम स्थान...

NCP leaders meet at Ajit Pawar's Mumbai residence: अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Ajit Pawar, eknath shinde
Ajit Pawar, eknath shindesaam tv
Published On

Eknath Shinde On Ajit Pawar: राज्यात वर्षभरानंतर पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीत अजित पवार यांचा गट आला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या राज्याच्या या सर्वात मोठ्या राजीनामा नाट्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून नव्या राजकीय समीकरणाचा राज्याच्या विकासाला याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हणले आहे.. (Maharashtra Politics)

Ajit Pawar, eknath shinde
Maharashtra Political News: ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते; त्यांनाच... राजकीय भूकंपावर संजय राऊतांचे खोचक ट्वीट

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) सर्वात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ( NCP news in maharashtra)

काय म्हणाले एकनाथ शिंदे....

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारला विकासाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी साथ दिली आहे. अजित पवार यांनी विकासाचे राजकारण केले असून काम करणाऱ्या नेत्याला जेव्हा दुय्यम स्थान दिलं जाते तेव्हा अशा घटना घडतात;" असे म्हणत महाराष्ट्राच्या विकासाला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले आहेत..

Ajit Pawar, eknath shinde
Teachers Transfer News: राज्यातील शिक्षकांच्या बदल्या बंद होणार; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा, कारणही सांगितलं

राऊतांचा टोला..

या राजकीय भुकंपानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी "भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.." असा सणसणीत टोला लगावला आहे.

तसेच "माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू; असेही ते म्हणाले आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com