
Maharashtra Political News: महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलली आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Maharashtra Political News)
संजय राऊत ट्वीट..
राज्याच्या राजकारणाला आज दुपारी मोठा हादरा बसला. शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादीमध्येही (NCP) उभी फूट पडली असून अजित पवारांसह ४० आमदारांसह भाजप- शिंदे सरकारमध्ये सामिल झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाआहे. या राजकीय भुकंपानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी "भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.." असा सणसणीत टोला लगावला आहे. तसेच "माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू; असेही ते म्हणाले आहेत..
दरम्यान, अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.