

सिंधुदुर्गात ठाकरे गट आणि मनसेला धक्का
विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर भाजपमध्ये
मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश
विनायक वंजारे, साम टीव्ही
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरही राजकीय नेत्यांना धक्के सुरूच आहे. राजकीय नेते आणि कार्यकर्ते आताही सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आनंद परांजपे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता राज ठाकरे यांना सिंधुदुर्गात मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी नारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सिंधुदुर्गातीतल मांगवली गाव भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. याच गावातील ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मांगवली गावात भाजपची ताकद वाढल्याची चर्चा रंगली आहे. पक्षप्रवेशावेळी भाजप पदाधिकारी राजेंद्र राणे, माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन महेश संसारे उपस्थित होते.
कुणी कुणी केला भाजपमध्ये प्रवेश?
ठाकरे गटाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे, माजी शाखाप्रमुख मधुकर आयरे, प्रविण राणे युवा शाखा प्रमुख प्रवीण राणे, बूथ अध्यक्ष अंकुश गुरव, संतोष गुरव, साहिल गुरव यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
मांगवली येथील सिद्धी संतोष नारकर यांच्या समवेत मनसेचे संतोष नारकर, समीक्षा नारकर, साई नारकर, विलास नारकर, विघ्नेश नारकर, विजय नारकर, वैशाली नारकर, सुरेंद्र आपिष्टये, गणेश आपिष्टये, नागेश आपिष्टये, सिद्धेश आपिष्टये, सुरेश रेडिज, अशोक आपिष्टये, आशिष आपिष्टये, नागेश आपिष्टये, पुष्पा हेगिष्टे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.