मोदींच्या आवाहनाविरोधात पवार-ठाकरे आक्रमक, 'चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का?'

PM Modi Appeal On Economy Public Reaction And Political Response: पंतप्रधान मोदींनी देशाला आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी जनतेला आवाहन केलयं...मात्र मोदींनी केलेल्या वेगवेगळ्या आवाहनामुळे विरोधक कसे आक्रमक झालेत...देशात नेमकं काय घडतयं? सर्वपक्षीय बैठकीची मागणी का जोर धरू लागलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Opposition leaders Sharad Pawar and Raj Thackeray react strongly to PM Modi’s economic appeal, demanding accountability and broader consultation.
Opposition leaders Sharad Pawar and Raj Thackeray react strongly to PM Modi’s economic appeal, demanding accountability and broader consultation.saam tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला आर्थिक संकटामुळे काटकसरीचं आवाहन केलं...आणि संपूर्ण देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली...विरोधकांना कुठलीच पूर्वसुचना न देता देशाच्या सर्वाच्च नेत्यानं केलेल्या या घोषणेमुळे आता विरोधकही आक्रमक झालेत...राज ठाकरेंनी तर चुका तुमच्या मग भुर्दंड जनतेला का? असा थेट सवाल पंतप्रधानांना विचारलाय...

'चुका तुमच्या, भुर्दंड जनतेला का?'

स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत. स्वतःवर फुलं उधळून घेतायत त्याचं काय करणार आहात आपण? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कुणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? हे आत्ताच का सुचलं? महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून, ही योजना केवळ निवडणुकीपुरता केलेला अफाट पैशाचा खेळ आहे. स्वत: पंतप्रधान 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत. हे दौरे थांबवा, मग लोकांना आवाहन करा.

दुसरीकडे आर्थिक संकट सोडवण्यासाठी शरद पवारांनी अर्थतज्ज्ञांसोबत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्याचा सल्ला पंतप्रधानांना दिलाय..मोदींच्या आवाहनानंतर पवारांची पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीनं बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा.

दरम्यान आदित्य ठाकरेंनी मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.. "जनतेने काय करावे आणि काय करू नये, हे सांगायला हे काय बिग बॉसचे घर आहे का?" असा सवाल त्यांनी केलाय. तर, सुप्रिया सुळेंनी अर्थव्यवस्थेवर मोठा हल्ला झाला असून लोकांना अंधारात ठेवू नका, अशी विनंती त्यांनी सरकारला केलीय... एकीकडे पंतप्रधान आर्थिक संकाटातून वाचवण्यासाठी जनतेला साद घालत असले तरी दुसरीकडे विरोधकांनी याला मोदी सरकारचं अपयश ठरवलंय... त्यामुळे आता पंतप्रधान सर्वपक्षीय बैठक घेऊन विरोधकांच्या शंकाचं निरसन करणार की फक्त वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून आपला अजेंडा राबवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com