Ajit Pawar News: पाच-सहा दिवस जाऊ द्या, आम्ही उत्तरसभा घेऊ; शरद पवारांच्या सभेला अजित पवार देणार प्रत्युत्तर

Ajit Pawar On Sharad Pawar News: काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशकात मोठी सभा घेतली होती.
Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting
Ajit Pawar Group On Sharad Pawar MeetingSAAM TV
Published On: 

Nashik News: महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर लगेचच अजित पवारांनी झपाट्याने आपल्या कामाला सुरूवात केली. अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहत शक्तिप्रदर्शन केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशकात मोठी सभा घेतली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांसह फुटलेल्या गटावर हल्लाबोल केला होता. आता अजित पवार देखील नाशकात सभा घेऊन शरद पवारांना प्रत्युत्तर देणार आहेत. (Latets Poliotical News)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आम्ही उत्तरसभा घेऊ, काळजी करू नका. आम्ही अनुभवी असल्याने आम्हाला उत्तर देताना कोणतीही अडचण येणार नाही. पाच-सहा दिवस जाऊद्या. पालकमंत्र्यांसह या बाबत आम्ही चर्चा करू असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting
Maharashtra Politics: ते समाधानी आहेत का? खातेवाटपानंतर जयंत पाटील यांनी व्यक्त केली शंका, अजित पवार गटाला काढला चिमटा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी नाशकात जाहीर सभा घेतली होती. या सभेवेळी त्यांनी अजित पवार यांच्यासह सरकारमध्ये सहभागी झालेल्या मंत्र्यांवर निशाणा साधला होता. आता अजित पवार देखील लवकरच सभा घेणार असल्याने ते काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवारांचा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास

शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी अजित पवार आज नाशिकमध्ये आहेत. कार्यक्रमाला वेळेत पोहचता यावे यासाठी त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते नाशिक असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केल्याने उपस्थित काही प्रवाशांनी त्यांची भेट घेतली. रस्त्याला खड्डे असल्याने अजित पवारांनी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला अशी टीका आता विरोधक करत आहेत.

Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting
Special Report : Maharashtra Politics : महायुतीत रिमोट कंट्रोल कुणाच्या हाती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.