Maharashtra Politics: ते समाधानी आहेत का? खातेवाटपानंतर जयंत पाटील यांनी व्यक्त केली शंका, अजित पवार गटाला काढला चिमटा

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी खातेवाटपावरून अजित पवार गटाला चिमटा काढला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

sangli News: अजित पवार गटातील नेत्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना बडवे संबोधून शरद पवारांची साथ सोडली. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी खातेवाटपावरून अजित पवार गटाला चिमटा काढला आहे. (Latest Marathi News)

जयंत पाटील सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. जयंत पाटील मिरजेत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर टीका केली.

जयंत पाटील म्हणाले, 'आता राष्ट्रवादीमधून फुटून भाजपसोबत गेलेल्या लोकांना जी खाते मिळालेली आहेत. त्यांना मिळालेल्या खात्याबद्दल ते समाधानी आहेत का, ते बघावे लागेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला चिमटा काढला आहे.

Maharashtra Politics
Chhagan Bhujbal Threat Update: छगन भुजबळ धमकी प्रकरणात तरुणाला केलेली अटक बेकायदा, कोर्टाने दिला महत्वाचा आदेश

'आता १९ आमदारांचं आमच्याकडे बळ होतं. मात्र, त्यातील आमदार दोन्हीकडे हो म्हणणारे आहेत. पण आमदारांना त्यांच्या मनाप्रमाणे वागवून दिलं पाहिजे. ज्यांना जिथे जायचं आहे, त्यांना तिथे राहू दिले पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.

अजित पवार गटामधून ऑफर आल्याच्या चर्चेवर देखील जयंत पाटील यांनी भाष्य केलं. पाटील म्हणाले, 'मी शरद पवारांसोबत राहणार आहे. शरद पवार सांगतील ते धोरण ठरवणार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Maharashtra Politics
Maharashtra Political News: महाराष्ट्रात निवडून आलेल्या ४२२ आमदार, खासदारांवर गंभीर गुन्हे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड

'आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यातील अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, ते आम्ही मांडू असेही जयंत पाटील म्हणाले.

तसेच आता काँग्रेसकडे जास्त आमदारांची संख्या असल्याने राष्ट्रवादी आता विरोधी पक्ष नेत्यांवर दावा करणार नसून काँग्रेसने लवकर विरोधी पक्ष नेता निवडावा, असेही जयंत पाटील म्हणाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com