Chhagan Bhujbal Threat Update: छगन भुजबळ धमकी प्रकरणात तरुणाला केलेली अटक बेकायदा, कोर्टाने दिला महत्वाचा आदेश

Chhagan Bhujbal News: लोक अभिरक्षक कार्यालयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास दिलीये.
Chhagan Bhujbal Death Threat News
Chhagan Bhujbal Death Threat Newssaam tv
Published On

Chhagan Bhujbal News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या मंत्री छगन भुजबळांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी ११ जुलै रोजी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली होती. आता ही अटक बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Political News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लोक अभिरक्षक कार्यालयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलीये. यानंतर आरोपीची न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिलेत.

Chhagan Bhujbal Death Threat News
Chhagan Bhujbal Threat: मोठी बातमी! कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करताना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही, असे निरीक्षण नोंदवून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांनी आरोपीची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. प्रशांत दशरथ पाटील (वय २४) असे जामिनावर मुक्तता करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मला भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे. उद्या मी त्यांना मारणार, असा दावा अज्ञात व्यक्तीने केला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवत संशयित व्यक्तीला अटक केली होती. मात्र ही अटक बेकायदा असल्याने आरोपीला जामिनावर सोडण्यात आलं आहे.

Chhagan Bhujbal Death Threat News
Asaram Bapu Gets Life Imprisonment: मोठी बातमी! आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर कोर्टाचा मोठा झटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com