Maharashtra Weather: महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी? ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका

Heatwave Intensifies Across Maharashtra: महराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. महाराष्ट्र रेड झोनमध्ये आहे. राज्यात उष्माघाताचे ३ बळी गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी? ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका
Heatwave Intensifies Across MaharashtraSaam Tv
Published On

Summary -

  • महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे

  • उष्माघातामुळे ३ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे

  • ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे

  • पुढील ४ दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता

गिरीष निकम, साम टीव्ही

सूर्य कोपला असून महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. उष्णतेची लाट जीवघेणी ठरतेय. कारण राज्यात उष्माघाताचे तीन बळी गेल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र रेड झोनमध्ये गेला असून कोणत्या जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका आहे? पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये...

वाढत्या पाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. अगदी कोकणापासून ते विदर्भापर्यंत उन्हाच्या तीव्र झळांनी जीव कासावीस होत आहे. सर्वाधिक 44 अंश तापमान असलेल्या अकोल्यामध्ये रिक्षामध्ये एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर हिंगोली मध्ये शेख रफिक शेख उस्मान या 30 वर्षे तरुणाचा बसस्थानक परिसरात मृत्यू झाला आहे. तर वाशिममधील नर्सरीमध्ये 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये 'कोल्ड रूम' आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Maharashtra Weather: महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी? ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका
Maharashtra Weather : महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्त्वाचे, उष्णेतची तीव्र लाट येणार; अकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीशी पार

राज्यातील २७ जिल्ह्यांना अति-उच्च उष्णतेचा धोका आहे. ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका आहे. ७६ टक्के लोकसंख्येला उष्णतेचा धोका आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला असून त्यानुसार एसओपी पण जाहीर करण्यात आली आहे.पुढील 4 दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये.कुठल्या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट आहे पाहूया...

या ९ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट-

सांगली

सोलापूर

संभाजीनगर

जालना

परभणी

हिंगोली

अकोला

अमरावती

वर्धा

Maharashtra Weather: महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी? ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका
Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, जगातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?

वाढत्या उष्णतेमुळे उघड्यावर काम करणारे मजुर, कामगार, शेतकरी यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात, 'प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर' म्हणजेच पुढचा दीड महिना कडक उन्हाचा असल्याने आजारी पडण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Maharashtra Weather: महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी? ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका
Weather Update: महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये उष्णतेची लाट; तर ८ राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com