Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, जगातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?

Maharashtra Weather Update News : अकोल्यातील तापमानाचा पारा ४३.८ अंशांवर गेला आहे. त्यामुळे अकोला हे शहर देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर ठरले आहे. पुढील काही दिवसांत तपमान ४५ अंश सेल्सिअसवर जाणार असून विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, देशातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?
Maharashtra Weather Update NewsSaam Tv
Published On
Summary
  • अकोल्यात तापमान ४३.८°C नोंद

  • देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर

  • विदर्भात उष्णतेची लाट कायम

  • ४५°C पर्यंत तापमान जाण्याची शक्यता

  • नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

अक्षय गवळी, अकोला

Today Maharashtra Weather Update News गेल्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसाने धुडगूस घातला होता. मात्र आता अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असून उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४०शी पार गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी विदर्भातील तापमान ४० शी पार आहे. अकोल्यात गेले दोन दिवस असलेल्या तापमानामुळे, अकोला शहर देशातील दुसरे सर्वात जास्त उष्ण असलेले शहर ठरले आहे.

काल अकोल्यात ४३.१ अंश सेल्सियस इतकं तापमानाची नोंद झाली होती. तर आज अकोल्यातील तापमान ४३.८ अंश सेल्सिअस इतके आहे. हवामान विभागाने पुढचे काही दिवस अकोल्यासह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून अकोलेकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, देशातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?
Shocking : घराच्या जिन्यावर बसलेल्या कोब्राने घेतला २ वर्षीय मुलाचा जीव; संभाजीनगरमध्ये खळबळ

जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या ‘एल डोराडो’ या संकेतस्थळानुसार, अकोला हे शहर जगातील सर्वात जास्त उष्ण असणारे दुसरे ‘हॉट’ शहर ठरले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये उष्णतेचा पारा ४५ अंश सेल्सिअस पार करण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून ८ दिवस तीव्र उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. एप्रिलमध्येच उन्हाचा चटका त्रासदायक ठरल्याने आता नागरिकांना मे महिन्याची चिंता भेडसावत आहे.

Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, देशातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?
Pune : पुणे हादरलं! प्राचार्यने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, तरुणीने संपवल आयुष्य; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं कारण

दुपारच्या वेळेस काय काळजी घ्याल?

  • दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे

  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत

  • उन्हात वाहने शक्यतो चालवू नये

  • ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे

  • लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत

  • तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे

  • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा

  • पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com