Pune : पुणे हादरलं! प्राचार्यने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, तरुणीने संपवल आयुष्य; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं कारण

Pune News : पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये प्राचार्यावर मानसिक छळ आणि गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणी संबंधित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.
Pune : पुणे हादरलं! प्राचार्यने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, तरुणीने संपवल आयुष्य; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं कारण
Pune PHD Student Girl Sucide Over Teacher HarassmentSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या

  • सुसाईड नोटमध्ये प्राचार्यावर गंभीर आरोप

  • मानसिक छळामुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा

  • आरोपी प्राध्यापक अटकेत, तपास सुरू

गोपाळ मोटघरे, पिंपरी

Pune PHD Student Girl Sucide Over Teacher Harassment शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थनींने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने सुसाईड नोट लिहिली होती. या चिठ्ठीत तिने कॉलेजचे प्राचार्य गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले. यामुळे तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक असणाऱ्या सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन याला अटक करण्यात आली आहे. तर आत्महत्या करणाऱ्या तीस वर्षीय विद्यार्थिनींच्या वडिलांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने शनिवारी ११ एप्रिल रोजी राहत्या घरी शाहूनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित तरुणी बॉटनी या विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडी करीत होती. तर आरोपी बिन्नियमिन तिचा प्राचार्य होता, तसेच कॉलेजचा संचालक देखील होता. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून ठेवली.

Pune : पुणे हादरलं! प्राचार्यने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, तरुणीने संपवल आयुष्य; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं कारण
Shocking : जत्रेत बेशुद्ध केलं, नंतर निर्जनस्थळी सामूहिक बलात्कार; तरुणीसोबत भयंकर घडलं

या सुसाईड नोटमध्ये तिने ऑगस्ट २०२५ पासून बिन्नियमिन हा अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत असल्याचं म्हटलं.त्याच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आधी बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नाही. चूक झाली असे लिहून दिले होते.

Pune : पुणे हादरलं! प्राचार्यने केला पीएचडीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, तरुणीने संपवल आयुष्य; आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहलं कारण
Crime News : दिल्ली हादरली! धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर फेकून दिलं नंतर...

परंतु, संबंधित तरुणी या मानसिक धक्क्यातून सावरली नव्हती. त्यामुळे तिने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. याप्रकरणी मृत विद्यार्थिनींच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बिन्नियमिन याला अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवार १५ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com