Shocking : घराच्या जिन्यावर बसलेल्या कोब्राने घेतला २ वर्षीय मुलाचा जीव; संभाजीनगरमध्ये खळबळ

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये घरात खेळत असताना २ वर्षीय मुलाला कोब्रा सापाने दंश केला. उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर.
Shocking : घराच्या जिन्यावर बसलेल्या कोब्राने घेतला २ वर्षीय मुलाचा जीव; संभाजीनगरमध्ये खळबळ
Sambhajinagar NewsSaam Tv
Published On
Summary
  • संभाजीनगरमध्ये सर्पदंशाची दुर्दैवी घटना

  • २ वर्षीय मुलाचा कोब्राच्या दंशाने मृत्यू

  • जिन्यात खेळताना घडली घटना

  • रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू

  • उन्हाळ्यात सापांपासून सावध राहण्याचे आवाहन

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Cobra Bite 2 Year Old Child Death Case संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातील जिन्यात खेळत असताना एका २ वर्षीय मुलाला कोब्रा सापाने दंश केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शंभू ज्ञानेश्वर दांडगे ( Shambhu Dandge ) असं या मृत मुलाचं नाव आहे. शंभू हा दांडगे कुटुंबियातील एकुलता एक मुलगा होता; त्याच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पालकांच्या निष्काळीपणामुळे ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथे घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास शंभू घरातील जिन्याजवळ खेळत होता. याच वेळी जिन्यावर कोब्रा जातीच्या साप दबा धरून बसला होता. अजाणतेपणाने शंभूचा उजवा पाय सापावर पडला आणि कोब्राने त्याला दंश केले.

Shocking : घराच्या जिन्यावर बसलेल्या कोब्राने घेतला २ वर्षीय मुलाचा जीव; संभाजीनगरमध्ये खळबळ
Crime News : मेव्हण्याच्या घरात भावोजीचा दरोडा; खबऱ्याची टीप अन् तिथंच बिंग फुटलं, राष्ट्रीय खेळाडूसह ७ जण सापळ्यात अडकले

यामुळे शंभू जोरजोरात रडू लागला. त्याच्या आवाजाने त्याची आई त्याच्याजवळ गेली असता त्याच्या पायातून रक्त येत असल्याचे दिसले. काही वेळातच त्याची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला करमाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी शहरात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यापूर्वीच शंभूचा मृत्यू झाला.

Shocking : घराच्या जिन्यावर बसलेल्या कोब्राने घेतला २ वर्षीय मुलाचा जीव; संभाजीनगरमध्ये खळबळ
Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

पोटच्या एकुलत्या एक लेकराच्या मृत्यूने शंभूच्या आईने हंबरडा फोडला, तसेच दांडगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे साप बिळाबाहेर पडतात. घराजवळ कचरा, लाकडं ठेवल्यास साप त्याचा आधार घेऊन तिथेच मुक्काम ठोकतात. त्यामुळे उन्हाळ्यात रात्रीच्या सुमारास बाहेर पडताना काळजी घ्यावी असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com