Navratri 2026 : दुष्काळामुळे महाराष्ट्रात दांडिया रद्द? मराठी एकीकरण समितीची मागणी

Maharashtra Navratri 2026 Garba Dandiya : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात गरबा-दांडियाची तयारी सुरू असताना भव्य आयोजन आणि खर्चावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मराठी एकीकरण समितीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अशा आयोजनांबाबत भूमिका मांडली आहे.
maharashtara navratri garba cancelled news
maharashtara navratri garba cancelled news AI Image
Published On: 

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला गरबा आणि दांडियाच्या धुमधडाक्यात आयोजनाला, मुंबईसह राज्यभरात आता सुरुवात झालीये. मोठमोठी मैदानं, नामांकित सिंगर, स्पॉन्सरशीप आणि कोट्यावधींचे बजेट आयोजकांनी तयार ठेवलंय. अगदी ऑनलाईन तिकीट विक्रीचाही धुरळा उडालाय. मात्र आता याच गरबा आणि दांडियाचे आयोजन करू नका, अशी थेट मागणी होऊ लागलीये. मराठी एकीकरण समितीने या भव्य-दिव्य गरबा दांडियाला थेट विरोध दर्शवल्याने, आता मुंबईसह संपूर्ण राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली.

आज महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. तब्बल ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भागावर दुष्काळाचं संकट आहे. अशा संकटात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी या दांडिया आणि गरब्यावर न करता, तोच पैसा बळीराजाला मदत म्हणून देणे आणि संवेदनशीलता जपणे ही भावना नक्कीच स्वागतार्ह आहे.

maharashtara navratri garba cancelled news
Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

मात्र, दुर्दैवाने गरबा आणि दांडियासारखे कार्यक्रम आता केवळ सांस्कृतिक न राहता, व्यावसायिक आणि राजकीय इव्हेंट झालेत. विशेषतः गुजराती बहुल भागात राजकीय नेते आणि कार्यकर्ते आपापली व्होटबँक जपण्यासाठी, दांडियाच्या आयोजनात सर्वात पुढे असतात.

त्यामुळे आता खरी परीक्षा याच पुढाऱ्यांचीये. हे नेते आपली राजकीय व्होटबँक सुरक्षित करण्यासाठी कोट्यावधींची उधळपट्टी करतात. की बळीराजाचं दुःख जाणून, हा पैसा दुष्काळग्रस्तांच्या पदरात टाकून संवेदनशीलता दाखवतात? हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com