डोंबिवलीचा प्रसिद्ध ‘रासरंग’ यंदा रद्द; शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Dombivli Rasrang Dandiya Festival Cancelled: डोंबिवलीतील प्रसिद्ध रासरंग दांडिया उत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. उत्सवासाठीचा निधी पावसामुळे नुकसान झालेल्या संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
DOMBIVLI RASRANG DANDIYA CANCELLED
DOMBIVLI RASRANG DANDIYA CANCELLEDsaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा डोंबिवलीतील प्रसिद्ध ‘रासरंग दांडिया उत्सव’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवाच्या आयोजनासाठी करण्यात येणारा निधी यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

DOMBIVLI RASRANG DANDIYA CANCELLED
Pune Sanjay Kakade News | मुरली मोहोळ यांच्या उमेदवारीला माझा विरोध नाही पण.. | Marathi News

डोंबिवलीतील नवदुर्गा मित्र मंडळ आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाला डोंबिवलीसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि परिसरातून हजारो नागरिक उपस्थित राहत असतात. मात्र, यंदा राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक हातचे गेल्याने अनेक शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात असताना मोठ्या स्वरूपात दांडिया उत्सव साजरा करण्याऐवजी त्याच्या आयोजनासाठीचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

DOMBIVLI RASRANG DANDIYA CANCELLED
पुण्यातील १२ दिवसांचा दारूबंदी आदेश रद्द; आता फक्त याच दिवशी ड्राय डे, हायकोर्टानंही कडक शब्दांत ओढले ताशेरे

नवदुर्गा मित्र मंडळ आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात येणार आहे. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आणि कोणत्या स्वरूपात ही मदत करायची, याबाबतचे नियोजन सुरू असून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन मदतीचे स्वरूप निश्चित केले जाणार असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. अकोला, बुलढाणा यांसह विविध भागांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे सांगण्यात आले. शेतकरी कुटुंबांना मदत करताना त्यांच्या मुलांचे शिक्षण, विवाह तसेच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येही मदतीचा हात देण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.

DOMBIVLI RASRANG DANDIYA CANCELLED
CM फडणवीसांच्या सचिवांचे बॅनर अन् शिंदेंच्या आमदारांचे कार्यकर्ते संतापले; शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, यंदा रासरंगचा भव्य दांडिया उत्सव रद्द करण्यात आला असला तरी नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. साधेपणाने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना करण्यात येणार आहे. उत्सव दरवर्षी साजरे करता येतात. मात्र, संकटाच्या काळात अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे, या भूमिकेतून रासरंगचा जल्लोष बाजूला ठेवून शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मदतीबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com