

अशोक खरातने १ किलो मध ९ लाखांना विकल्याचा धक्कादायक प्रकार
शक्तीवर्धक नावाखाली श्रीमंत आणि राजकारण्यांची फसवणूक
काळा पैसा पांढरा करण्यासाठी घोटाळ्याचा वापर
भोंदूगिरी, फसवणूक आणि काळ्या पैशाचा खेळ, ढोंगी खरातची कृष्णकृत्य आता एकामागून एक उघड होऊ लागलीयेत. या नराधमानं महिलांचं लैंगिक शोषण केलं. लोकांच्या श्रध्देशी खेळत त्याने रानटी चिंचोके खडे म्हणून विकले.
नकली नागाचं वशीकरण दाखवून भोळ्या भक्तांना लुटलं. आणि आता १ किलो मध ९ लाख रूपयांना विकूनही दाखवलं. बड्या हस्तींना वैवाहिक जीवनात सुख मिळावं यासाठी गलिच्छ सल्ले देत, शक्तीवर्धक आणि कामोत्तेजक मधाची लाखोंना विक्री करुन त्यानं अनेकांचे खिसे कापले, त्याचा हा विकृत धंदा कसा सर्रास सुरु होता, पाहा,
तुर्कीचं मध कामोत्तेजक आणि शक्तीवर्धक असल्याचा दावा करून अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दरानं विक्री करायचा. 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकत. त्यातही खरातकडे लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांनाच मधाची विक्री केली जायची. हे मध तुर्कीमधील एल्विश हनी असल्याचा आणि तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेतून मिळत असल्याचा दावा करायचा.. खरात या मधात कामोत्तेजक गोळ्या कुटून टाकत असल्याचंही समोर आलयं.. मध विकून आलेली रक्कम खरात ट्रस्टच्या नावे घ्यायचा आणि ब्लॅक मनी व्हाईट करायचा.
खरात सारख्या भोंदूच्या नादी लागून अनेकांनी आपलं आयुष्य उद्धवस्त करुन टाकलं. पण कामोत्तेजक मधाच्या गोडीनं चक्क राजकारण्यांनी आणि पांढरपेशी श्रीमंतांनी खरातच्या दरबारात आपल्या तुंबड्या रिकाम्या केल्या. तर अनेकांनी याच गोड-गोड मधाच्या विक्रीतून काळा पैसा पांढरा करुन काळा व्यवहार केला. त्यामुळे या भोंदू खरातकडून हे कामोत्तेजक मध घेऊन ज्यांनी आपल्या अतृप्त गरजा पुर्ण केल्या. त्यासगळ्यांची नावं पोलिसांनी समोर आणून समाजात वावरणाऱ्या या पांढरपेशींचे काळेधंदे उघडे पाडायलाच हवे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.