महाराष्ट्रातला जगावेगळा निकाल, एकाच कुटुंबातील चौघेजण वेगवेगळ्या पक्षातून लढले आणि जिंकले, नेमकं काय राजकारण घडलं?

Thane Municipal Election Unique Family Political Victory: महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीत जगावेगळा निकाल समोर आला आहे. ठाण्यात एकाच कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक लढवून विजय मिळवला असून हा निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे.
Members of the same family celebrate victory after winning from different political parties in Thane municipal elections.
Members of the same family celebrate victory after winning from different political parties in Thane municipal elections.Saam Tv
Published On

29 महापालिका निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निकालामध्ये पुन्हा एकदा विरोधकांचा धुव्वा उडवत भाजपने मुसंडी मारली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापलिकेवर देखील भाजपने झेंडा फडकवला असून ठाकरे बंधुना मोठा धक्का बसला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात एक जगावेगळा निकाल लागला आहे.

Members of the same family celebrate victory after winning from different political parties in Thane municipal elections.
Sanjay Raut on BMC Election: भाजप ५१, ठाकरे ४९, अजून ६०-७५ जागांचा निकाल बाकी, ठाकरेंना अजूनही विश्वास

एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि तिघेही जिंकून आले. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ठाणे येथील या कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली होती आणि निकाल लागताच तिघांचा विजय झाल्याने राजकीय वर्तुळात या तीन उमेदवारांची चर्चा सुरू आहे.

Members of the same family celebrate victory after winning from different political parties in Thane municipal elections.
Sangli Result: सांगलीत पाटलांना धक्का, भाजपच्या विजयाचा बैलगाडा सुसाट; विजयी उमेदवारांची यादी

वेगवेगळ्या पक्षातून लढवली होती निवडणूक

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रल्हाद म्हात्रे हे मनसेकडून निवडणूक लढवत होते तर रेखा म्हात्रे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या आणि रवी म्हात्रे हे भाजपच्या तिकिटावर जिंकून आले. पण मनसेकडून निवडून आलेले प्रल्हाद म्हात्रे यांना विजय जरी मिळाला असला तरी भाजप आणि शिंदेंची सत्ता महापालिकेत आल्याने ते नाराज झाले आहे.

Members of the same family celebrate victory after winning from different political parties in Thane municipal elections.
Municipal Election Result: मुंबईवर भाजपचाच झेंडा, राज्यात 25 ठिकाणी सत्ता, महापालिका विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

ठाणे हा पारंपरिक एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंची युतीमध्ये निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही एकटी मैदानात उतरली होती. 131 जागांपैकी शिंदेसेनेने 87 तर भाजपला 40 जागांवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे ठाकरे बंधू हे एकत्र ठाण्यात निवडणूक लढवत होते. मात्र या ठिकाणी त्यांचा भुईसपाट झाल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com