Sanjay Raut on BMC Election: भाजप ५१, ठाकरे ४९, अजून ६०-७५ जागांचा निकाल बाकी, ठाकरेंना अजूनही विश्वास

Sanjay Raut on BMC Municipal Election Result: मुंबई महापालिकेत भाजपने विजय मिळवला आहे. परंतु अजूनही ६० ते ७५ जागांचा निकाल बाकी आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
BMC Election
BMC ElectionSaam Tv
Published On

मुंबई महानगरपालिकेचा निकाल जवळपास स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. मुंबईत भाजपची सत्ता येणार असल्याचे चित्र दिसत असतानाच आता संजय राऊतांनी वेगळाच दावा केला आहे. अजूनही ६०-७५ जागांचा निकाल बाकी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाला अजूनही विजयाचा विश्वास आहे. संजय राऊतांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

BMC Election
Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

संजय राऊतांचं ट्विट (Sanjay Raut on BMC Result)

मुंबई महापालिका निकाल! सपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. ६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत. लढत अटी तटीची आहे. पण शिवसेना एम न से टक्कर देत आहे! भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे! दुपार नंतर शिवसेना मनसे चे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत! पण न्यूज़ चैनल जुनाच आकडा दाखवीत आहेत! पाहू, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांचा वेगळाच दावा (Akhil Chitre on BMC Election)

ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनीदेखील भाजप फक्त ५१ जागांवर आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 5 वाजेपर्यंतची ताजी मतमोजणी स्थिती (मतमोजणी सुरूच):

•भाजप (BJP) – 51

•शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 49

•शिंदे गट – 14

•मनसे (MNS) – 6

अजून काही फेऱ्यांची मोजणी बाकी असल्याने चित्र बदलू शकतं. अंतिम निकालानंतरच स्पष्ट बहुमत व आघाडीची स्थिती समजेल.अमित साटम, निलेश राणे अपडेट हवे असतील तर सांगा, असं त्यांनी म्हटलं आहे.

BMC Election
Jalgaon Municipal Election: शिंदेंच्या उमेदवाराने जेलमधून जिंकली निवडणूक; माजी महापौर ललित कोल्हेंसह कुटुंबातील दोघेजण विजयी

अमित शाह यांची प्रतिक्रिया

भाजपचा विजय झाल्यानंतर अमित शाह यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला मिळालेलं प्रचंड यश एक गोष्ट स्पष्ट करते – ती म्हणजे आज देशातल्या काना-कोपऱ्यातील जनतेचा विश्वास फक्त आणि फक्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील NDA सरकारच्या विकासाच्या धोरणावरच आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे महाराष्ट्रातील महायुती सरकारने विकास आणि जनकल्याणाच्या केलेल्या कार्यांवर जनतेने उमटवलेली पसंतीची मोहोरच. या प्रचंड समर्थनाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे मनापासून आभार! मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, , उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे , भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा-शिवसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांचं या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!

BMC Election
Municipal Election Result: सांगली, मिरज महापालिकेत भाजप काठावर पास; फक्त एका जागावर गेम अडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com