Mumbai Municipal Corporation: राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला, आंबेडकरांची साथ?

Mumbai Municipal Corporation Election: महापालिका निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र ही आघाडी कोणत्या पक्षांची असणार आहे, आणि आघाडीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नेमकी काय भूमिका मांडलीय..पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट.
Mumbai Municipal Corporation Election
Political movements intensify ahead of Mumbai Municipal Corporation elections.saam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकीसाठी राज्यात हालचालींना वेग आलाय.

  • मुंबई महापालिकेत तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे.

  • काँग्रेस–प्रकाश आंबेडकर यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा

राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलंय. मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिंदेसेना, मनसे आणि ठाकरेसेनेच्या युतीसाठी जोर बैठका सुरु आहेत. दरम्यान राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगलीय. आणि त्याला कारण ठरलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुप्तपणे घेतलेली प्रकाश आंबेडकरांची भेट. याच भेटीत काँग्रेसनं वंचितला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र हा प्रस्ताव नेमका काय आहे.पाहूयात.

Mumbai Municipal Corporation Election
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का? शिक्षा झाल्यास मंत्रीपद अन् आमदारकीचं काय होणार?

खरंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसला. त्यात वंचितच्या मतांचाही समावेश आहे. आता मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. मात्र पुन्हा मतविभाजनाचा फटका बसू नये म्हणून वंचितसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत भेट झाल्याचं मान्य करतानाच प्रकाश आंबेडकरांनी युतीचा निर्णय मुंबईची कमिटी घेईल, असं म्हणत युतीबाबत सूचक संकेत दिलेत.

Mumbai Municipal Corporation Election
Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

खरंतर पंडित नेहरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांचे मोठे टीकाकार. मात्र त्यानंतरही देशासाठी दोघांनी एकाच मंत्रिमंडळात काम केलं. मात्र त्यांचे वारस असलेले राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेला युतीची अयशस्वी चर्चा केली. मात्र तेव्हा एकत्र येण्याची राहिलेली उणीव भरुन काढत नेहरुंचे नातू राहुल गांधींची काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणार का? यावर महापालिकेतील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com