Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

Dhananjay Munde Delhi Visit: फ्लॅट घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतलीय. या भेटीमुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अटकळांना उधाण आले आहे.
Dhananjay Munde  Delhi Visit
NCP MLA Dhananjay Munde during his high-profile visit to Delhi amid Maharashtra political churn.saam tv
Published On

सदनिका घोटाळाप्रकरणात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला. कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्ली गाठत थेट अमित शहा यांची भेट घेतलीय.

माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय. अशात माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे मुंडेंनी मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली का अशी चर्चा सुरू झालीय.

Dhananjay Munde  Delhi Visit
Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा

आमदार धनंजय मुंडे यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आलंय. माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागेल अशी चर्चा सुरू झालीय. त्यामुळं मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. जवळपास एक तास धनंजय मुंडे हे संसद भवनात होते.

दरम्यान धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वापसी होणार असल्याचं बोललं जातंय पण याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही माहिती दिलेली नाहीये. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दिल्लीत आहेत. त्यामुळे मुंडेंचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जातोय.

Dhananjay Munde  Delhi Visit
Zilla Parishad Election: जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार? महापालिकांसाठी घोषणा झाली, ZP निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार?

नाशिक उच्च न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलेत.

दरम्यान या प्रकरणी कोकाटे यांच्यावरील कायदेशीर कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा घ्यावा असा दबाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पक्षांतर्गत टाकला जातोय. पक्ष स्वच्छ प्रतिमेसाठी कोकाटे यांना मंत्रीपदावरून बाजूला केलं जाईल असं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com