Municipal Election Result: सांगली, मिरज महापालिकेत भाजप काठावर पास; फक्त एका जागेवर गेम अडला

Sangli-Miraj-Kupwad Election: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत धक्कादायक निकाल लागलाय. भाजपनं ३९ जागा जिंकल्या असून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण ७८ सदस्यांच्या सभागृहात स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
Sangli-Miraj-Kupwad Election:
Celebrations and reactions after Sangli-Miraj-Kupwad municipal election results were announced.saam tv
Published On
Summary
  • सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत एकूण 78 जागा

  • भाजपला 39 जागा, स्पष्ट बहुमतापासून एक जागा कमी

  • भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला

विजय पाटील, साम प्रतिनिधी

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. अनेकठिकाणी क्रॉस व्होटिंगचे प्रकार घडले असून त्यामुळे भाजपला मोठा फटका बसलाय. सांगली येथे 78 जागांसाठी असलेल्या महापालिकेत भाजपला 39 जागा मिळाल्या. त्यामुळे महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमतापासून भाजप केवळ एक पाऊल दूर राहिले.

Sangli-Miraj-Kupwad Election:
ठाकरेंचा पराभव जिव्हारी, मोदींचा राजीनामा; बंटी पाटलांचं कौतुक करत घेतला मोठा निर्णय

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये भाजप स्वबळावर लढली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी 40 जागांची आवश्यकता आहे. परंतु भाजपला 39 जागाच मिळाल्या. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र निवडून आणली होती, तर ठाकरेंची सेना, शिंदेंची सेना स्वबळावर लढली होती. भाजपला काठावरचे संख्याबळ मिळाल्यामुळे भाजप कोणाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करते याकडे लक्ष लागून राहिलेय.

Sangli-Miraj-Kupwad Election:
ठाकरेंच्या उमेदवाराचे समर्थक संतापले, मतदान केंद्राबाहेर राडा; पोलिसांवर दगडफेक, जमावावर सौम्य लाठीमार

कुपवाडमध्ये तीन उमेदवार विजयी झाले अन् शहर जिल्हाध्यक्ष पडले

याठिकाणी भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात लढत झाली. भाजपच्या प्राजक्ता धोत्रे, मालुश्री खोत आणि प्रकाश पाटील हे 3 उमेदवार विजयी झाले. मात्र याच प्रभागातील ब गटातून उभे असलेले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग पराभूत झाले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी पराभूत केलं.

माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का

सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकाल लागला. येथे भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटील यांच्या स्नुषा मीनल अजिंक्य पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या प्रभागातून माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या पत्नी काँग्रेसच्या उमेदवार दिपाली पाटील निवडून आल्या. या प्रभागात काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com