ठाकरेंच्या उमेदवाराचे समर्थक संतापले, मतदान केंद्राबाहेर राडा; पोलिसांवर दगडफेक, जमावावर सौम्य लाठीमार

Jalgaon Municipal Election Result : जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार कुलभूषण पाटील यांच्या समर्थनार्थ जमाव आक्रमक झाला. आक्रमक झालेल्या जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करत रस्त्यावरील दुचाकींची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. प्रभाग 10 मध्ये फेर मतमोजणीच्या मागणीसाठी मतमोजणी केंद्र बाहेर मोठा जमाव जमला होता.
Jalgaon Municipal Election Result :
Police controlling an aggressive crowd outside Jalgaon municipal election counting centre.Saam tv
Published On
Summary
  • जळगाव महापालिका निवडणूक मतमोजणीदरम्यान गोंधळ

  • प्रभाग 10 मध्ये फेर मतमोजणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन

  • पोलिसांवर दगडफेक, दुचाकींची नासधूस

महापालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झालेत. राज्यातील २९ पैकी २५ ते २६ महापालिकांमध्ये भाजपनं बाजी मारलीय. मात्र अनेक ठिकाणी विरोधी पक्षातील उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतलाय. जळगावातील मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. येथील प्रभाग १०मधील फेर मतमोजणी करण्यात यावी यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. आक्रमक झालेल्या जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. येथे ठाकरे गटाकडून कुलभूषण पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत

कुलभूषण पाटील हे प्रभाग १०मधून निवडणूक लढवत आहेत. मतमोजणी झाल्यानंतर कुलभूषण पाटील यांच्या समर्थकांनी फेर मत मोजणी करण्याची मागणी केली. निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेर मतमोजणी घेण्यात आलीच नाही, त्यामुळे कुलभूषण पाटलांचे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले. मतमोजणी केंद्राबाहेर जमा झाल्यानंतर त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच रस्त्यावरील दुचाकींची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत जमावावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com