

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी
नवीन वर्षात सुरु होणार ठाणे मेट्रो 4
कोणती स्थानके असणार?
Thane Metro: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मेट्रो आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.ठाण्यातील मेट्रो लवकरच सुरू होणार या अपेक्षेने ठाण्याच्या मेट्रो प्रकल्प ४ ची चाचणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यात आली होती. सध्या मेट्रोचे चाचणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर मेट्रो लवकरच प्रत्यक्षात सुरु केली जाईल.
ठाणे मेट्रोची चाचणी सुरु (Thane Metro 4 Trial Run)
मेट्रो ४ सेवा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मेट्रो ४ च्या चार मेट्रो स्थानकां पर्यंत ही चाचणी करण्यात आली होती. मेट्रो प्रकल्प चार चा पहिला टप्पा हा ठाण्यातील गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानक पर्यंत सुरू होणार आहे. यासाठी आधी पहिल्या चार स्थानकांपर्यंतच मेट्रोची चाचणी करण्यात आली होती.उर्वरित ६ स्थानकांपर्यंत मेट्रोची ट्रायल चाचणी सध्या घेतली जात आहे.त्यामुळे सर्व चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो सुरु केली जाईल.
नवीन वर्षात सुरु होणार ठाणे मेट्रो 4 (Thane Metro 4 Starting date)
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठाणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहेत. हा प्रवास गायमुख मेट्रो स्टेशन ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानक पर्यंत केला जाणार आहे. सध्या उरलेल्या ६ स्थानकांची ट्रायल रन सुरु आहे. ही ट्रायल रन झाल्यानंतर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.
ठाणे मेट्रोची स्थानके (Thane Metro 4 Stations List)
ठाणे मेट्रो ४ च्या पहिल्या टप्प्यात एकूण १० स्थानकांचा समावेश आहे. सध्या या स्थानकांची चाचणी घेतली जात आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख (Cadbury Junction to Gaimukh Metro) यामध्येही मेट्रो धावणार आहे. त्यातील स्थानकांची नावे जाणून घ्या.
कॅडबरी जंक्शन
माजीवाडा
कपूरबावडी
मानपाडा
टिकूजी-नी-वाडी
डोंगरी पाडा
विजय गार्डनर
कासारवडवली
गव्हाणपाडा
गायमुख
कशी असणार मेट्रो 4? (Metro 4 Route Details)
मेट्रो ४ ही दोन भागांमध्ये विभागली आहे. मेट्रो ४ ही ३२.३२ किमी लांबीची असणार आहे. त्याला जोडून पुढे मेट्रो 4A जोडली जाणार आहे. ही मेट्रो २.७ किमी लांबीची असणार आहे. या मार्गात एकूण ३२ स्थानके असतील. दरम्यान, १० स्थानकांचा पहिला टप्पा नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरु होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.