लोकसभेत राहुल गांधींनी हिंदू धर्मांवरून केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यातील विधानपरिषदेत उमटलेत. विधान परिषदेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिवीगाळ केलीय. विधान परिषदेच्या सभागृहात दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटल्याचं दिसून आलं. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवेंनी आपला शिवसेनेचा बाणा कायम ठेवत लाड यांना दम भरला. माझ्यावर कोणी बोट उचललं तर मी त्याचा बोट तोडून टाकण्याची ताकद माझ्या मनगटात आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरुन जुंपल्याचे पाहायला मिळालं. दानवेंनी लाड यांना शिवीगाळ केली. दोन्ही नेत्यांना वाद झाल्यानंतर सभागृहाच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचं कामकाज स्थगित केलं.
विधानपरिषदेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकमेकांना शिवीगाळ केलीय. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवेंनी आपला शिवसेनेचा बाणा कायम ठेवत लाड यांना दम भरला. माझ्यावर कोणी बोट उचललं तर मी त्याचा बोट तोडून टाकण्याची ताकद माझ्या मनगटात आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र यावर दानवेंनी राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधानपरिषदेत चर्चा नको, अशी भूमिका घेतली. यावरुन दानवे आणि लाड यांच्यात वाद पेटला होता. दानवे बोलत असतानाच प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हात करत विरोध दर्शवला. त्यावेळी दानवेंनी माझ्याकडे हात करायचा नाही, असं म्हणत लाड यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी परत लाड यांना दम भरला. माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेना विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे. माझ्यावर कोणी बोट उचलेल त्याच बोट तोडण्याची ताकद माझ्या मनगटात आहे. कारण माझा तोल गेला नव्हता. राहुल गांधी केलेलं विधान हे लोकसभेत केलं होतं, त्याचा या विधान परिषदेशी काही संबंध नव्हता.
लाड यांनी सभागृहाच्या सभापतींशी बोलावं. त्यांनी माझ्याकडे बोट करुन बोलण्याचा काही संबंध नवहता. माझ्या बोट दाखवून, हात दाखवून समोरील सदस्यांना अधिकार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातून जाणाऱ्या व्यक्ती जो जुमा-जुमा करत आलाय, त्याने मला हिंदुत्व शिकवू नये, माझ्यावर ७५ केसेस आहेत. चार-चार वेळेस मी तडीपार झालेल्या माणूस आहे. मला हिंदुत्व शिकवाणार प्रसाद लाड कोण असं दानवे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.