बावनकुळेंचा महाराष्ट्र पॅटर्न देशभरात! थेट मोदी सरकारकडून दखल; प्रत्येक कार्यालयाला ५० लाखांचे अनुदान

Chandrashekhar Bawankule Model Registration Office Initiative: महाराष्ट्रातील मॉडेल नोंदणी कार्यालयाच्या उपक्रमाची केंद्र सरकारकडून दखल. देशभर अशी कार्यालये सुरू करण्याच्या सूचना; प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधीची तरतूद.
MAHARASHTRA MODEL REGISTRATION OFFICE TO GO NATIONWIDE
MAHARASHTRA MODEL REGISTRATION OFFICE TO GO NATIONWIDEsaam tv
Published On

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या उपयोगितेची दखल केंद्र सरकारने घेतली असून, पुणे येथे सुरू झालेले मॉडेल नोंदणी कार्यालय आता देशभर प्रारंभ करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाने दिले आहेत. विशेष म्हणजे, केंद्रीय भू-संसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी अशी कार्यालये देशभर सुरू करण्यासाठी प्रत्येक कार्यालयासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले.

MAHARASHTRA MODEL REGISTRATION OFFICE TO GO NATIONWIDE
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येणार, मोठी अपडेट आली समोर

केंद्रीय भू-संसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित 'केंद्रीय नोंदणी विधेयक, २०२६' संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे व उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे उपस्थित होते. या बैठकीत प्रस्तावित विधेयकातील तरतुदी, संभाव्य परिणाम आणि राज्यस्तरावरील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करून राज्यांचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या.

MAHARASHTRA MODEL REGISTRATION OFFICE TO GO NATIONWIDE
Maharashtra Farmer: शेतकरी दुष्काळाने त्रस्त, कृषिमंत्र्यांसमोर अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाने महसूलवाढीसोबतच नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यावर, सर्व राज्यांनी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरू केलेल्या 'एक जिल्हा, एक नोंदणी', 'ई-प्रमाण', पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर उभारलेली 'आदर्श कार्यालये' आणि 'ई-नोंदणी' यांसारख्या गतिमान उपक्रमांचे केंद्रीय सचिवांनी विशेष कौतुक केले.

MAHARASHTRA MODEL REGISTRATION OFFICE TO GO NATIONWIDE
राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा! शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना खरमरीत पत्र; केल्या 'या' ९ मोठ्या मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' संकल्पनेला गती देत, नागरिकांच्या सोयीसाठी भविष्यातही अधिक लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पुणे येथे सुरू झालेल्या मॉडेल कार्यालयाची दखल केंद्राने घेतली. यातूनच या कार्यालयाची उपयोगात लक्षात येते.

चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

MAHARASHTRA MODEL REGISTRATION OFFICE TO GO NATIONWIDE
दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकारची धावाधाव, राज्यात लवकरच दुष्काळ जाहीर होणार

आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाची रचना

पुणे येथील कोथरूड भागात महाराष्ट्रातील पहिले कार्यालय सुरू

पहिल्या टप्प्यात राज्यात आदर्श दुय्यम निबंधक कार्यालये

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या सहा प्रमुख जिल्ह्यांमधील मुख्यालयांच्या ठिकाणी ३० नवीन आदर्श कार्यालये

'स्लॉट बुकिंग'द्वारे अत्यंत जलद दस्त नोंदणी.

हाय-स्पीड स्कॅनिंगद्वारे त्वरित डिजिटल दस्त रेकॉर्ड.

अत्याधुनिक बायोमॅट्रिकद्वारे जलद डिजिटल ओळख पडताळणी.

एकाच दिवसात दस्त नोंदणी व पावती.

कागदपत्रांची पूर्व तपासणी करून त्रुटींचे निवारण.

हेल्पडेस्कद्वारे प्रवेशापासून अर्ज भरेपर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन.

डिजिटल टोकन आणि स्क्रीनवर थेट डिस्प्ले.

आरामदायी सोफे असलेले सुसज्ज वातानुकूलित प्रतीक्षालय.

सर्व नागरिकांना विनामूल्य हाय-स्पीड वाय-फाय सुविधा.

स्वच्छ प्रसाधने, पिण्याचे पाणी आणि चहा-कॉफी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com